March 16, 2026
IMG-20260316-WA0081

शंभू फरतडे✍️

महाराष्ट्राच्या परंपरेत तालिम हि एक शारीरिक, मानसिक आणि नैतिक जडणघडणीचे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते . लाल मातीत घाम गाळून पैलवान तयार करणाऱ्या तालमीत शिस्त, आरोग्य, निर्व्यसनी जीवन आणि जातीय सलोखा जपला जायचा . स्वराज्याच्या व स्वातंत्र्य चळवळीत देखील या तालमींचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. रामदास स्वामींनी तरुण पिढीला शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठिकठिकाणी मारुतीची (हनुमान) मंदिरे व तालमींची स्थापन केली. ही मंदिरे केवळ उपासनेची स्थळे नसून, तेथे व्यायामाची, सोय व्हायची .पुर्वी तालीम हे केवळ कुस्ती शिकण्याचे ठिकाण नसून ते चारित्र्य घडवणारे संस्कार केंद्र म्हणून ओळखले जायचे .

दररोज संध्याकाळनंतर व भल्या पहाटे ज्या वास्तू मध्ये दंड बैठकांचा हुंकार घुमायचा, पैलवानांच्या पक्कडी रंगायच्या शड्डू थोपडल्याचे आवाज घुमायचे, लाल माती मध्ये मेहनत करून अनेकांनी बलदंड शरीरयष्टी कामवाली त्या वास्तुचा म्हणजेच तालमींचा आज सर्वांना विसर पडलला आहे ! पैलवान घडवणाऱ्या गावोगावच्या तालमींना बकाल स्वरूप आले असून काही ठिकाणी चक्क मुतारी म्हणून तालमींचा वापर होत असल्याचे विदारक चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.

का वाढला बकाल पणा?

सध्या लालमातीशी निष्ठा असलेली पिढी हरवत चालली असून जिम, बाॅडी बिल्डिंग ,सिक्स पॅक च्या नादात लाल मातीची निष्ठा वाहून गेली आहे.पूर्वीच्या काळात पैलवान हे केवळ शरीरयष्टीनेच नाही, तर चारित्र्यानेही समाजाचे आदर्श असायचे. खाशाबा जाधव, हरिश्चंद्र बिराजदार यांच्यासारख्या मल्लांनी कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून दिली. मारुती माने आणि गणपतराव आंदळकर यांसारख्या दिग्गज पैलवानांनी लाल मातीचा दरारा सातासमुद्रापार पोहोचवला. हे पैलवान अत्यंत कडक शिस्त, निर्व्यसनी जीवन आणि गुरुभक्तीसाठी ओळखले जायचे समाजाचे रक्षण करणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हे त्यांचे संस्कार होते, ज्यामुळे गावागावात त्यांना आदराचे स्थान असायचे. आगदी अलीकडच्या काही काळा पर्यंत करमाळा तालुक्या पुर्ते बोलायचे झाल्यास महाराष्ट्र चॅम्पियन्स आमदार नारायण आबा पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन्स पै मा .उप सभापती दत्तात्रय सरडे, डबल उप महाराष्ट्र केसरी माजी सभापती अतुल पाटील, महाराष्ट्र केसरी माजी सभापती चंद्रहास निमगिरे, महाराष्ट्र केसरी बालारफी शेख, महाराष्ट्र चॅम्पियन्स अफसर जाधव यांनी संयम शिस्त, निष्ठेने कुस्तीची परापंरा जोपासली परंतूआजच्या पिढीला त्यांचा हाच संयम आणि निष्ठेचा वारसा अभ्यासावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अर्धवट पैलवान होयचं व ताकदीच्या जोरावर अवैध धंदे वाळू उपसा, व्याज बट्टा व राजकीय नेत्यांसाठी मारामाऱ्या या मुळे पैलवानांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. पहिल्या सारखे घरटी पैलवान असावा अशी सामान्य लोकांची इच्छा कमी झाली.

●तालमींची दुर्दशा होण्यामागे प्रामुख्याने बदलती जीवनशैली आणि प्रशासकीय दुर्लक्ष हे सुद्धा महत्वाचे कारण आहे

●आजकालची तरुण पिढी पारंपरिक कुस्तीपेक्षा जिम आणि आधुनिक व्यायामाकडे अधिक वळली आहे, ज्यामुळे तालमींमधील गर्दी ओसरली. तसेच, अनेक ठिकाणी तालमींच्या जागांवर अतिक्रमणे व तालमींची प्रंचड दुरावस्था झाली असून या कडे स्थानिकप्रशासन व नागरिक यांचे ,दुर्लक्ष झाले आहे. देखभालीसाठी लागणाऱ्या निधीचा अभाव असल्याने या वास्तू पडायला आल्या आहेत.

● राजकीय व लोकइच्छाशक्तीची कमतरता आणि कुस्तीगीरांना मिळणाऱ्या तुटपुंज्या सोयीसुविधांमुळेही या संस्कृतीला उतरती कळा लागली आहे. गावोगावच्या जत्रांमधील कुस्तीचे फड कमी होणे आणी गोरगरीब कुटुंबातील होतकरू पैलवानाला मिळणारा राजाश्रय किंवा पाठबळ आता मिळत नाही या सर्व कारणांमुळे एकेकाळी हुंकार घुमणाऱ्या तालमी आज बकाल झाल्या आहेत.

तालमीं बदं पडल्याने महाराष्ट्राच्या भावी पिढीचे होतय न भरून येणारे नुकसान !

तालमी बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील शिस्तबद्ध व्यायाम संस्कृती संपली आहे . त्यामुळेच लहान व किशोर वयात होणारे कुस्ती संस्कार बंद झाले, कुस्ती ची आवड संपली आहे. तालमींच्या अभावामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून, मैदानी खेळांऐवजी मोबाईलच्या आहारी जात आहे. कुस्तीसारखा ऐतिहासिक वारसा संपत असल्याने कधी काळी नामांकित मल्ल असणाऱ्या गावात एक ही पैलवान तयार होताना दिसत नाही.

तालीम वाचवण्यासाठी हे प्रयत्न गरजेचे!

सर्वप्रथम आमदार, खासदार तसेच ग्रामपंचायत स्थानिक निधीतून जुण्या तालमींची तात्काळ दुरस्ती, लाल माती बरोबरच अधुनीक साहित्य व मॅट उपलब्ध करून देणे व सर्वात महत्वाचे म्हणजे किशोर वायातील मुलांना लालमातीकडे वळवण्यासाठी गावातील जुण्या पैलवानांनी एकत्रित येणे वेळ प्रसंगी लोकसहभाग लोकवर्गणीतून शाळा महाविद्यालय येथे कुस्ती साठी प्रोत्साहन देणे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *