March 15, 2026
IMG-20260312-WA0044
करमाळा तालुका युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्यावतीने हिवरे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना उद्या सोमवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी आठ वाजाता उन्हाळी कॅप चे वाटप करण्यात येणार आहे 

शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला “ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण” हा कानमंत्र स्मरणात ठेवून करमाळा शिवसेना व युवासेनेकडुन नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर असतो .दरवर्षी शिवजयंती तसेच शिवसेना – युवासेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी , अल्प दरात ऑपरेशन, सर्व रोग निदान शिबिर, वृषारोपन याचे आयोजन केले जाते .

याच अनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थांना उन्हापापसून सरंक्षण म्हणून कॅप (टोपी ) वाटपाची संकल्पना सुरू केली असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे शाहुराव फरतडे यांनी सांगतीले.

या बाबत अधिक माहिती सांगताना फरतडे म्हणाले की ,ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरील मुलं जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात .उन्हाळ्यात दुपारी शाळा सुटत असल्याने त्यांना भर उन्हात पायपिट, किंवा सायकल वरून प्रवास करावा लागतो .उन्हा मुळे चक्कर येणे ,डोकेदुखी, डोळ्याचे विकार घडतात .या गोष्टीचे गांभीर्य ओळखून युवासेनेच्या वतीने सामाजिक जबाबदारी म्हणून दोन वर्षापासून “युवासेना सावली उपक्रम ” राबवत आहोत . या उपक्रमांतर्गत हिवरे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील १ ली ७ वीच्या १५० लहानग्या विद्यार्थांना या कॅप वाटल्या जाणार आहेत. भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त शाळांना या मध्ये सहभागी करून घेण्याचा माणस असल्याचे देखील फरतडे यांनी सांगतीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *