करमाळा_चौफेर
हिवरे , ता. करमाळा येथील शेतकरी विनोद प्रकाश पाटील, यांच्या शेतातील टेक्समो कंपनीची 7.5 HP ची मोनोब्लॉक मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दि. 06/05/2026 रोजी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीत विनोद पाटील यांनी म्हटले आहे की,शेती पिकाला पाणी देण्यासाठी दि. 11/04/2026 रोजी शिवशक्ती इरीगगेटर्स करमाळा येथून टेक्समो कंपनीची 7.5 HP ची मोनोब्लॉक मोटर किंमत 35,500 रु. देऊन खरेदी केली होती.सदर मोटर माझ्या गट नं 169/3 या शेतातील विहिरीवर बसवली होती. दि. 05/05/2026 रोजी रात्रीच्या सुमारास पाईप व केबल कापून चोरट्यांनी मोटर चोरून नेली आहे तरी गुन्हा दाखल करून चोरीचा तपास करावा असे विनोद पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

