करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
जेऊर येथील एका हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीने दोन महिन्यापुर्वी आत्महत्या केली होती .मात्र हे प्रकरण दडपून यातील काही आरोपींना वाचवले जात असून सदर पिडित अल्पवयीन मुलीवर अनेकांनी ब्लॅकमेल करून शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचा आरोप करमाळा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले यांनी सोशल मिडियावर केला होता.
त्याच बरोबर या प्रकारणात तपास अधिकरी म्हणून असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांवर सोशल मिडियावरच अक्रमक पोस्ट करून हे प्रकरण चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता.
मागील चार ते पाच दिवसांपासून मोघम सुरू असलेल्या या पोस्टबाजी नंतर जेष्ठ पत्रकार येवले यांनी मलाच संबंधित तपास अधिकाऱ्यांकडून हस्ते परहस्ते अट्रोसिटी ची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला व संबंधित पोस्ट करमाळा तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रुपवर शेयर केली. या गंभीर आरोपा नंतर खरंतर पोलीसांकडून तातडीने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करण्यात येईल अशी अपेक्षा होती, मात्र पोलीसांकडून यावर काहीच प्रतिक्रिया न आल्याने या प्रकारणात आणखी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

जेष्ठ पत्रकार विवेक येवले यांनी या संदर्भात सोशल मिडियावर अवाज उठवून प्रकरण उजेडात आणल्यानंतर आणखी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या चळवळीत सहभाग घेऊन महिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना खुले पत्रक काढून या प्रकारणात लक्ष घालण्याची मागणी केली होती.

करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन तृप्ती देसाई यांनी व्हिडीओ पोस्ट करून उद्या साडे दहा वाजता करमाळा पोलीस स्टेशन मध्ये येवून संबंधित प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे सांगतीले आहे.

तृप्ती देसाई करमाळ्यात आल्यानंतर पोलीस निरिक्षक व पोलीस उपाधिक्षक यांची देखील भेट घेणार आहेत. तृप्ती देसाई यांनी या प्रकारणात लक्ष घातल्याने यातील नेमका प्रकार उजेडात येईल का? पोलीसांची भुमिका काय असणार? व जर प्रकारणात तथ्य असेल तर कोणाला वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपले जात होते याचा उलगडा होवू शकतो अशी चर्चा करमाळा तालुक्यात सुरू आहे.

आपल्या लेकीला न्याय मिळवून देणे हे केवळ कर्तव्य नसून आपली नैतिक जबाबदारी आहे,” अशी भावना व्यक्त करत सर्व राजकीय पक्ष, महिला संघटना आणि माध्यम प्रतिनिधींना या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

