April 8, 2026
IMG-20260408-WA0046

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

करमाळा नगरीत अध्यात्मिक आनंदाची पर्वणी येणार असून, १५ मे ते २१ मे या कालावधीत स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती आणि संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी दिली आहे. करमाळा शहर हे ऐतिहासिक अशा श्री . कमलाभवानी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, या धार्मिक भूमीत होणारा हा कथेचा कार्यक्रम भाविकांसाठी मोठी पर्वणी ठरेल .या सात दिवसांच्या काळात शिव कथेसोबतच विविध धार्मिक विधी आणि भजनांचे आयोजन केले जाणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत होणाऱ्या या कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खाटेर आणि मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे


खाटेर यांच्या वतीने करमाळा शहरात यापूर्वी विविध धार्मिक कथांचे यशस्वी आणि भव्य आयोजन करण्यात आले होते.
ओतूरकर महाराजांची भागवत कथा, पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांची शिव महापुराण कथा, रामराव ढोक महाराज यांची रामकथा,तसेच भगवानजी शर्मा भागवत कथा, रामकथा, अनुराधा दीदी यांची भागवत कथा यांचा समावेश आहे.

याच धार्मिक परंपरेला पुढे नेत अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भाविकांना शिव महापुराण कथेचा लाभ मिळावा आणि पुण्यसंचय व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रेणीक खाटेर यांनी दिली.

या संदर्भात सोमवार, दि. 5 एप्रिल रोजी संत गजानन महाराज मंदिर करमाळा येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस श्रेणिकशेठ खाटेर, विठ्ठलराव भणगे, कुरुलकर मॅडम, नगरसेवक दीपक चव्हाण रवींद्र विद्वत, चरणसिंग परदेशी, नारायण पवार, विजय देशपांडे, बबलू कुलकर्णी, पत्रकार दिनेश मडके, गिरीश शहा, दादासाहेब तनपुरे, प्रितम वीर शंकर रासकर, , राम टांगडे, सचिन सोरटे, सौ. संगीताताई खाटेर, हनुमान परदेशी, संदीप चुंग, आशिष बोरा, दिनेश मुथ्था, वैभव दोशी कांलिदी धोकेटे, कालीदास घोगरे, आडकर सर, विनोद कानडे, दिलीप शिरगिरे, मुळे सर, सुरेश आटोळे, देवकर काका उपस्थित होते.

बैठकीत शिव महापुराण कथा भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्याचा संकल्प करण्यात आला. करमाळा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *