March 28, 2026
1825937

करमाळा_चौफेर

इराण अमेरीका युद्धाच्या पार्श्वभूमीवर डिझेल पेट्रोल ची टंचाई व भविष्यातील खबरदारी म्हणून प्रशासनाकडून डिझेल व पेट्रोल विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. 

भाव वाढीच्या व डिझेल भेटणार नसल्याचे अफवेने पेट्रोल पंपावरून कॅन व  बॅलर मधून डिसेझ नेहूण साठेबाजी करण्याचा प्रयत्न होवू शकतो म्हणून पेट्रोल पंपांवरून कॅन मधून  डिसेझ पेट्रोल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती.  मात्र शेतीच्या कामांसाठी ट्रकट्रर, रोटावेटर, मळणी यंत्र तसेच जेेसीबी थेट पंपावर आणणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच सध्या उपलब्ध साठा असल्याने व या विषयांवर शेतकऱ्यांकडून तसेच सामाजिक संघटनांकडून मागणी करण्यात आल्यानंतर या निर्णयात जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून सुधारणा करण्यात आली आहे. अशी माहिती तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे. 

या निर्णया मुळे शेती कामांसाठी शेतकऱ्यांना आत्ता कॅन मधून डिझेल देण्यात येणार आहे मात्र याचा गैरवपार करून अवैध साठा चढ्या दराने विक्री केल्यास गंभीर गुन्हे दाखल करू असा इशारा तहसिलदार ठोकडे यानी दिला आहे. 

युवासेना तालुकाप्रमुख तथा पत्रकार शंभूराजे फरतडे यांनी या संदर्भात काल जिल्हाधीकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला होता यावर प्रशासनाकडून सहानुभूतीपूर्वक विचार झाल्याने युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *