करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
पुणे येथील थेऊर फाटा येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात दैनिक “जनसत्य”चे युवा पत्रकार विजय भानुदास निकत यांना ‘राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते आणि ऍड. महेश देवकाते, अभिनेत्री भारती जीभकाटे यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळेस अभिनेत्री रिया खुरपडे अभिनेत्री भक्ती परदेशी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडीयचे संपादक राहुल कुंदनर पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे आदी मान्यवर देखील उपस्थित होते
विजय निकत यांनी गेल्या २० वर्षांपासून पत्रकारितेसोबतच ग्रंथालय चळवळ आणि शिक्षण,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे,
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना विजय निकत म्हणाले की, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या २० वर्षांच्या प्रामाणिक पत्रकारितेचा आणि सामाजिक कार्याचा सन्मान आहे. विश्वसहारा संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे शैक्षणिक कार्य करत आहोत, त्याला या पुरस्कारामुळे नवी उभारी मिळाली आहे.
समाजातील उपेक्षितांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असून, हा सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल.” त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.करमाळा तालुका पत्रकार संघ , व सक्रिय पत्रकार संघा बरोबरच तालुक्यातील सर्व पक्षीय नेते ,सामाजिक कार्यकर्ते यांनी निकत यांचे अभिनंदन केले आहे.




