April 13, 2026
IMG-20260413-WA0039

करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍️)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त केम ता करमाळा येथे ‘महामानव केसरी’ या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८ वाजता श्री. उत्तरेश्वर केसरी स्पर्धा  झालेले  मैदान, केम-करमाळा रोड येथे या शर्यतीचा थरार रंगणार आहे.

‘एक दुस्सा एक बैल’ – महाराष्ट्रात प्रथमच

पै. शेखर तात्या गाडे, मा. सभापती पं.स. करमाळा यांच्या आयोजनाखाली होणारी ही शर्यत ‘एक दुस्सा एक बैल’ या प्रकारातील असून महाराष्ट्रात प्रथमच या स्वरूपाची शर्यत होत आहे. ‘उत्तरेश्वर केसरी’ 1 नंबरचा मानकरी बैल या शर्यतीचे मुख्य आकर्षण असणार आहे.

लाखाचे बक्षीस, लाईव्ह प्रक्षेपण

या शर्यतीसाठी भव्य बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. प्रथम बक्षीस 1,01,000 रुपये द्वितीय 81,000, तृतीय 71,000 असे एकूण 9 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रवेश फी 1,100 रुपये असून शर्यतीचे ‘Sharyat Adda’ वर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. प्रत्येकी फायनल राऊंडच्या गाड्यास 10 किलो गुलाल देण्यात येणार आहे.

या शर्यतीसाठी समालोचक संपत नाना वाघमोडे तर झेंडा पंच पप्पू मंडले राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती केम व समस्त ग्रामस्थ केम यांच्या वतीने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सभापती पै शेखर (तात्या ) गाडे यांनी या आगोदर केम मध्ये”महामानव केसरी ” या नावाने कुस्त्यांचे जंगी मैदान भरवून पैलवान व कुस्ती शौकीनांसाठी मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली होती . या वेळेस उत्कृष्ट नियोजन करून भव्य बैलगाडा शर्यत चे आयोजन करून बैलगाडा मालकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *