करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुस्तकाचे लेखक जगदीश अशोक ओहोळ यांना ‘युवारत्न पुरस्कार’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ ची सायंकाळी ६ वाजता रामकृष्ण बँक्वेट रावेत या ठिकाणी करण्यात आले . प्रजेचा विकास या मीडिया समूहाद्वारे दरवर्षी राज्यातील अनेक मान्यवरांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा प्रजेचा विकास नागरी सन्मान पुरस्कार सोहळा रावेत येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक मा. ज.वि. पवार, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, पिंपरी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप, मावळ लोकसभा रिपाई आठवले गटाचे कार्याध्यक्ष दिलीप कडलक, भारतीय जनता पार्टीचे युवा आघाडीचे अध्यक्ष अनुप दादा मोरे, राष्ट्रीय कामगार नेते यशवंतराव भोसले व पिंपरी चिंचवड मनपाचे नगरसेवक बाळासाहेब तरस उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते जगदीश ओहोळ यांना सन्मानित करण्यात आले. कार्प्रकार्यक्र आयोजन प्रजेचा विकास माध्यम समूहाचे प्रमुख व विकास कडलक यांनीमाध्यम समूहाचे प्रमुख व विकास कडलक यांनी केले होते.

जगदीश ओहोळ लिखित अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या अल्पावधीत ७५ हून अधिक आवृत्ती प्रकाशित झाले असून या पुस्तकाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. ही सबंध भारतासाठी गौरवाची बाब आहे, जगदीश ओहोळ हे आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्राला प्रबोधित करण्याचे काम करत आहे. तर शब्दांना कार्याची जोड देत ‘जगदीशशब्द फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी अनाथ बालकांचे शैक्षणिक पालकत्वही घेतले आहे. यामुळेच जगदीश ओहोळ यांच्या कार्याचा गौरव करणे उचित वाटले असे यावेळी आयोजक पत्रकार व प्रजेचा विकास मीडिया ग्रुपचे प्रमुख विकास कडलक यांनी सांगितले. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून वक्ते व लेखक जगदीश ओहोळ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
जगदीश ओहोळ हे मुळचे करमाळा तालुक्यातील हिवरे (नागोबाचे) गावच सुपुत्र आहेत त्यांच्या या यशा बद्दल हिवरे ग्रामस्थ व करमाळा तालुक्यातील साहित्य क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.



