करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील केम येथे उद्या, २८ मार्च रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने एका भव्य ‘विराट हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शिवशंभू वेसीजवळ सायंकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत पार पडणार असून, हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमासाठी ह.भ.प. लिंबाजी तिडके महाराज (परळीकर), हिंदू पुनरुत्थान सभेचे प्रस्थापना प्रमुख महेशजी केदार आणि श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या संमेलनातून जिथे धर्मरक्षण आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.केम परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी या विचारांच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



