शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून,त्यांना मंथन ,स्कॉलरशिप, नवोदय ,गुरुकुल आणि गणित मंडळ अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.त्यापैकी गणित मंडळ, गुरुकुल आणि नवोदय या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्या परीक्षांमध्ये दत्तकला आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

18 जानेवारी 2026 रोजी झालेल्या गणित प्राविण्य परीक्षेतून इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी अनन्या अंबादास मिंड हिची 26 एप्रिल 2026 रोजी सोलापूर येथे होणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली. आहे.

गणित प्राविण परीक्षेतून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनाच गणित प्रज्ञा परीक्षेसाठी प्रवेश मिळतो. 25 जानेवारी 2020 रोजी गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता सहावीच्या वेदांत संजय बाबर या विद्यार्थ्याने ३०० पैकी १९२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता चौथीची विद्यार्थिनी

शिवकन्या रामहरी मोरे ३००पैकी २०० गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. नवोदय विद्यालय समिती मार्फत घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत इयत्ता पाचवी चे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यामध्ये १.स्वरूप रवींद्र राऊत 100 पैकी 95
२.अनन्या अंबादास मिंड शंभर पैकी 88.75
३.माऊली सिद्धेश्वर गोडगे 100 पैकी 76.25
गुण मिळवून यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पालक वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे .

स्कूलचे प्राचार्य श्री विजय मारकड सर यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाच्या संदर्भात सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील असूनही अतिशय उत्कृष्ट यश मिळवले आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबर विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवला जातो. सरावासाठी सराव परीक्षांचा योग्य आयोजन केले जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होण्यासाठी अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी विद्यार्थी बसवले जातात व त्यांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते. पालक वर्गाचा पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या यशासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास झोळ सर , सचिवा सौ माया झोळ मॅडम, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री डॉ.विशाल बाबर सर, स्कूल डायरेक्टर सौ नंदा ताटे मॅडम, स्कूलचे प्राचार्य श्री विजय मारकड सर, परीक्षा प्रमुख श्री रवींद्र बाबर सर प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
