करमाळा_चौफेर शंभू फरतडे✍️
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.या बाबत नुकताच एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.
सोलापूरचे मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात चांगले काम केले आहे.२०२३ साली ते सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते. पत्रकार परिषद ,सोशल मिडियाच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात होते.करमाळा येथील पुर परस्थीतीत त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पहाणी केली होती. .
कोण आहेत नवीन रूजू झालेले जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन 👉श्री. कार्तिकेयन एस. (IAS) हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत असलेले एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत .



सोलापूर जिल्हा अधिकारी म्हणून आत्ता त्यांची कारकिर्द कशी असेल हे पहाण महत्वाचे आहे


