करमाळा_चौफेर ✍️
भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे यांनी कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे कौतुक करत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या त्यागाला दिले. केवळ उत्सव न साजरा करता जनसेवेच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळेस अधिक बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने केवळ विधानसभा व लोकसभा नव्हे, तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत यश मिळवले आहे. आगामी काळात जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे यांनी आपल्या भाषणात जनसंघापासून भाजपा पर्यंतचा प्रवास हा संघर्षमय असल्याचे सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय व डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या विचारसरणीतून पक्षाचा विस्तार झाला असून आज केंद्र सरकारच्या विविध जनहितकारी योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक दिपक चव्हाण यांनी केले. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, विठ्ठलराव भणगे व कन्हैयालाल देवी ,यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर अनेक लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी करून लाभ घेतला.

कार्यक्रमास पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी चिवटे, मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर संचालक अमोल यादव उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक सचिन घोलप, सचिन गायकवाड, विजय घोलप, महादेव फंड, सुनील बनसोडे नगरसेविका सुनीता ढाणे, पंचायत समिती सदस्या सोनाली तकीक, विजय लावंड, माजी नगरसेवक किरण बोकन, संजय कुलकर्णी, निलेश जोशी तसेच भाजपा शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, रामभाऊ ढाणे ,शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक सरचिटणीस जितेश कटारिया, उपाध्यक्ष सचिन चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार किसन मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी, आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष दिनेश मडके उत्तरेश्वर कामठेआदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कांबळे,पंकज सोळंकी,सूरज मिसाळ,मनोज कुलकर्णी, सौरभ शिंगाडे, प्रतीक चव्हाण,शिवराज सातपुते,गणेश कोकाटे ,अभय पाटील ,विशाल कुंभार आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले

भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचला.
