March 24, 2026
IMG-20260324-WA0044

करमाळा_चौफेर

ज्या सैनिकांमुळे आपण आपल्या घरात सुखाची झोप घेतो, त्यांच्याच पश्चात त्यांच्या कुटुंबाला असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे, ही देशासाठी शरमेची बाब आहे. सैनिक ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता अहोरात्र सीमेवर पहारा देतो . तो आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतो, मात्र त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या वृद्ध आई-वडिलांना किंवा पत्नीला समाजकंटकांकडून त्रास दिला जातो हे विदारक चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. असाच संतापजनक प्रकार साडे ता करमाळा येथे घडला असून ज्या मातेचा एक मुलगा देशासाठी शहीद झालेला आहे तर दुसरा मुलगा सीमेवर लढत आहे आज या कुटुंबातील वीर मातेच्या कुटंबाला चोरट्यांनी लक्ष केले असून जबरी मारहाण करून सोने लुटून नेले आहे. सदर प्रकार मंगळवार दि २३ रोजी घडला आहे.

सिताबाई बापूराव चौधरी रा साडे ता करमाळा या वीरमातेने या बाबत करमाळा पोलीसात फिर्याद दिली असून या मध्ये नाईट पॅण्ट टि शर्ट व चेहर्‍यावर मास्क लावलेल्या अनोळखी सात ते आठ जणांनी जबरी मारहाण करून १४७००० हजार रूपायांचे सोन्याचे दागीने चोरट्यांनी लंपास केले असल्याची फिर्याद दिली आहे.

या आगोदर देखील करमाळ्यात सिमेवर लढत असलेल्या जवानाच्या पत्नीचे करमाळा बस स्थानकावरून पाच तोळे सोने लंपास केले आहे मात्र दिड वर्ष झाले तरी आद्याप या चोरीचा तपास करणे पोलीसांना शक्य झाले नाही. सिमेवर लढत असलेल्या कुटूंबातील सदस्य सुरक्षित नसतील तर इतरांचे काय हाल होतील असा सवाल करत आम्ही कोणत्या मानसिकतेत देशाची सेवा करायची अशी खंत जवान संतोष चौधरी यांनी  व्यक्त केली आहे.

घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व पोलीस निरिक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वानपथका द्वारे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण साडे गावात आणि परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, ग्रामस्थांनी रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांकडून मागणी केली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *