करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु समजला जाणारा ‘आदिनाथ सहकारी साखर कारखाना’ आता लिलावाच्या उंबरठ्यावर उभा आहे. NCDC ने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची जमीन, इमारती आणि यंत्रसामग्रीचा ई-लिलाव जाहीर केला आहे. या लिलावासाठी १२२ कोटी २० लाख रुपयांची राखीव किंमत निश्चित करण्यात आली असून, २२ मे २०२६ रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. या संदर्भात सहा एप्रिल रोजी एका सुप्रसिद्ध दैनिकात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 

कारखान्यावर एकूण ६३ कोटी ७६ लाखांचे मूळ कर्ज आणि त्यावरील व्याजाची मोठी थकबाकी आहे. शेलगाव आणि भालवणी येथील सुमारे ९५ हेक्टर जमिनीसह संपूर्ण कारखाना संकुल या लिलावात विकले जाणार आहे. ऐन राजकीय धामधुमीत कारखान्यावर ओढवलेल्या या संकटामुळे सभासद शेतकरी आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, आता कारखान्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी सत्ताधारी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


या आगोदर हा कारखाना बारामती अग्रॉने घेतला होता परंतू कारखाना खासगी करण केले जाईल असे सांगून आदिनाथ बचाव च्या माध्यमातून जनआंदोलन उभे केले गेले. नतर तानाजी सावंत यांनी देखील काही रक्कम बॅंकेत जमा करून कारखाना घेण्याचा प्रयत्न केला होता .मध्यंतरी या कारखान्यावर प्रशासकीय संचालक नेमले होते. 
काही दिवसांपुर्व या कारखान्यची निवडणूक होऊन आदिनाथ कारखाना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात आला असून आमदार पाटील स्वतः या कारखान्याचे चेअरमन आहेत.


