March 30, 2026
IMG-20260330-WA0028

 करमाळा_चौफेर

महिलादिनानिमित्त आयोजित केलेल्या हिरकणी स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांनी पहिल्या क्रमांकाचे ३२”स्मार्ट एल. इ. डी. टीव्ही चे पारितोषिक पटकावले. जेऊर येथे ॲड. सविता शिंदे, विजया कर्णवर, उज्जवला मेहता, माया कदम, कोमल गोरे, आरती शिंदे इ. नी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध गुणदर्शन सोर्धेत दुसरे पारितोषिक दीपाली वाघमोडे, तिसरे पारितोषिक मनीषा लोंढे यांना व उत्तेजनार्थ पारितोषिक विशाखा मेहता यांना मिळाले. अशी माहिती ॲड सविता शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी माया झोळ,डॉ. विद्या दुरंदे, विद्या बारकुंड, डॉ. भारती हजारे, एलिझाबेथ असादे, रेश्मा भोगे, ॲड संगीता यादव, जयश्री सलगर, वर्षा सोनवणे, पूनम शिंदे, विद्या सरडे, अपेक्षा ॲड, लता गावडे इ. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्जवला मेहता होत्या. प्रमुख पाहुण्या पंचायत समिती करमाळा तालुका अभियान व्यवस्थावक सुषमा बिचुकले होत्या.कार्यक्रमाचे प्रस्थाविक ॲड सविता शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन विजया कर्णवर यांनी व आभार प्रदर्शन आरती शिंदे यांनी केले.

कार्यक्रमात विविध स्पर्धांचे संचालन ॲड कोमल गोरे, समीना शेख, सुजाता जाधव यांनी केले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून विजयमाला चवरे, गीता कापडी, विणा देवी, ॲड संगीता यादव यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती सपकाळ, ऍड. दीपाली पन्हाळकर, ॲड भाग्यश्री वाशिंबेकर इ. यांनी मदत केली.

सर्व महिलांसाठी सचिन निमगिरे यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व पारितोषिक मिळवलेल्या स्पर्धकांना . ॲड सविता शिंदे, विजया कर्णवर, उजवला मेहता, कोमल गोरे यांच्यातर्फे टि.व्ही, डिनर सेट, मूर्ती, किचनवेअर इ. वस्तू भेट देण्यात आल्या. स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभागृह उपलब्ध करून दिले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *