March 26, 2026
IMG-20260326-WA0015(1)

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

उमरड येथील मोहन चौधरी यांची कन्या कू नेहा चौधरी हिची धर्मदाय निरिक्षक पदी निवड झाली आहे.नेहा यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद प्राथमिक शाळा उमरड व माध्यमिक शिक्षण: वामनराव बदे माध्यमिक विद्यालय उमरड येथेच पुर्ण झाले आहे. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. अंतर्गत पदवीचे शिक्षण पुर्ण केले.आहे. 

Charity inspecto(class 2).धर्मदाय निरिक्षक हे क्लास टू ची महत्वाची पोस्ट नेहा यांनी प्राप्त केली आहे.महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत सार्वजनिक न्यास (Trusts) आणि संस्थांच्या नोंदणी, हिशोब व मालमत्तेवर देखरेख ठेवणारे निरीक्षक (Inspector) हे महत्त्वाचे पद आहे. हे अधिकारी ट्रस्टचे ऑडिट, बेकायदेशीर गैरव्यवहार तपासणे आणि अहवाल सादर करणे ही कामे करतात, ज्यासाठी भरती प्रक्रिया TCS iON पॅटर्ननुसार होते .

धर्मादाय निरीक्षक सार्वजनिक ट्रस्ट, मंदिरे, आणि NGO च्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणे,ट्रस्टच्या नोंदणीची पडताळणी करणे,वार्षिक हिशोब (Audit) तपासणे,ट्रस्टच्या मालमत्तेच्या गैरव्यवहारांची चौकशी करणे.

अनियमितता आढळल्यास चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करणे हि कामे करतात.

नेहा यांच्या यशा बद्दल सार्थ भावार्थ रामायणाचे लेखन ह‌.भ.प.चिंतामणी महाराज घोडके,भक्त भावार्थ रामायण ग्रुप चे निर्माते ह.भ‌‌.प.परमेश्वर महाराज शिंदे,ह.भ.प.विठ्ठल महाराज पाटील व शिवव्याख्याते ह.भ.प.संजय महाराज बाबर तसेच उमरड येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *