March 17, 2026
IMG-20260317-WA0055
पंचायत समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य दिनदलित उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडवा,शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजवंत लाभार्थ्यांना द्या अशा प्रकारच्या सूचना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ पूजाताई ढेरे यांना दिल्या .

पंचायत समितीचे सभापती पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौ .पुजाताई ढेरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले .याप्रसंगी शुभेच्छा देताना श्री जगताप बोलत होते .

पुढे बोलताना जगताप यांनी सांगितले की तुम्हाला अल्पवयात पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळालेली आहे यातून तुम्ही तुमचे कर्तृत्व सिद्ध करून तुमच्या कामाच्या माध्यमातून पुढील पिढीला आदर्श ठरावा असे कामकाज करा असे आवाहन केले .स्व यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष पदाचा मान देशभक्त नामदेवराव जगताप यांना मिळाला होता . त्यांनीत्यांचा कामाचा ठसा असा उमटवला होता की आजही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आवर्जून केला जातो .याच माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते .याचा देखील आवर्जून उल्लेख यावेळी जगताप यांनी केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *