loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट या वर्षी फक्त ५१ मंडळानेच केली गणेशस्थापना

एकीकडे अनलॉक च्या अटि शिथिल होत असतानाच कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण अढळुन येत आहेत. या परिणाम गणेशोत्सवावर देखील झाला असुन कोरोनाच्या संकटा मुळे करमाळा तालुक्यातील ८८ गणेश मंडळानी यंदा गणेशोत्सव रहित केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गत वर्षी करमाळा तालुक्यात एकुण १३९ मंडळांनी गणेश स्थापना केल्याची नोंद करमाळा पोलिस स्टेशन ला झाली होती वर्षी मात्र फक्त ५१ मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे.

स्थापना केलेल्या सार्वजनिक मंडळांनी उत्सव साजरा करत आसताना खबरदारी घ्यावी. अनावश्यक गोष्टी टाळुन गर्दी टाळावी. जागेवरच विसर्जन करावे सामाजिक अंतर राखण्यावर भर द्यावा.. श्रिकांत पाडुळे (पोलिस निरीक्षक करमाळा)

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

गत वर्षी 'एक गाव एक गणपती' या धर्तीवर एकुण २० गावात हि संकल्पना राबवली गेली होती या वर्षी एकुण मंडळाची संख्या कामी असताना सुद्धा २४ 'गावात एक गाव एक गणपती' संकल्पना राबवली गेली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कोरोना मुळे सर्वच सार्वजनिक गणपती मंडळे या वर्षी साधे पणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत तर बऱ्याच मंडळांनी गणेशोत्सव रहित केल्याने मुर्तीकार, वाद्यपथक, हारफुले विक्रेते, लोककलावंत, इलेक्ट्रॉनिक दुकाने यांच्यासह अनेक घटकांना याचा फटका बसणार आहे,

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts