loader
Breaking News
Breaking News
Foto

"याच साठी केला होता अट्टहास !" करमाळा नगर पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाला चार चॉंद

करमाळा नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभाग घेतला होता. नगरपालिका मुख्याधिकारी वीणा पवार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शना खाली नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन शहराच्या सर्वांगीण स्वच्छेतेसाठी प्रयत्न केला. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे वेळप्रसंगी स्वत: हातात फावडे घेवुन गटारी साफ करत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अखेर या सर्वांच्या कष्टाला फळ मिळाले असुन "याच साठी केला होता अट्टहास !" असे म्हणत करमाळा नगर पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रमाळा नगरपरीषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा-२०२० मध्ये स्वच्छते विषयक केलेल्या विवीध उपक्रमांच्या जोरावर जिल्हयात प्रथम क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात २२ वा व पश्चिम भारत झोन मध्ये २९ वा क्रमांक पटकावून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

नगर पालिकेला मिळालेल्या या यशात शहर वासियांची साथ म्हत्वाची ठरली असुन भविष्यात देखील अशीच साथ दिल्यास करमाळा शहराचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही. कोणतेही काम करत असताना ते यशस्वी करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात त्या मुळे नागरिकांची मनं दुखावली जातात परंतु आम्ही हे सर्व जनते साठीच करत असुन तुमची साथ महत्वाची आहे -मुख्याधिकारी वीणा पवार

शहर प्रतिनिधी /सा करमाळा चौफेर

नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी प्रसंगी टिकाव -फावडे हातात घेवून, नगरपालिकेच्या नगरसेवक व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून स्वतःला झोकून देत शहर स्वच्छतेचे काम केले. स्वतःची 'स्वच्छतादूत ' म्हणुन ओळख निर्माण केली.. त्यांच्या या उल्लेखनिय कामगीरी बद्दल व यशाबद्दल सोलापूर जिल्हा नगर प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे यांनी कामाचे कौतुक करत समतेचा संदेश देणारे गौतम बुद्धांची प्रतिमा भेट देवून नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा सत्कार करून अभिनंदन केले पंकज जावळे यांनी करमाळा नगर पालिकेत मुख्याध्कारी म्हणुन काम केले असुन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे काम जवळुन पाहिले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा शहर स्वच्छ शहर करण्यासाठी मि नगराध्यक्ष होण्या आगोदर सुरवात केली होती. आज सर्वांच्या सहकार्यांने जिल्हयात प्रथम क्रमांक आला आहे. नागरिकांनी साथ दिल्यास राज्यात प्रथम येण्यास वेळ लागणार नाही. त्याच बरोबर स्वच्छता कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत आज फळाला आली आसुन त्यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे. असेह नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी सा करमाळा चौफेरशी बोलताना सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts