loader
Breaking News
Breaking News
Foto

कार्यकर्ता हिच खरी आमची दौलत- धैर्यशील मोहिते पाटील*

करमाळा- (प्रतिनिधी) शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज सातोली ता.करमाळा येथे उपस्थित राहत मोहिते-पाटील गटाचे युवा नेते अमरजित साळुंके यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरा चे उदघाटन व वृक्षारोपण त्यांच्या हस्ते झाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी शुभेच्छा देताना मोहिते-पाटील म्हणाले की, कै. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे पासून आजतागायत कै.शंकरराव साळुंके बापूंचा परिवार आमच्या परिवाराशी एकनिष्ठ आहे, तेही कोणत्याही अपेक्षे शिवाय, "कार्यकर्ता हीच आजही आमची खरी दौलत आहे, "हे आपल्याला अमरजित साळुंके यांच्या समाजहिताच्या कार्याने दिसत आहे आणि हाच सहकारमहर्षींचा वसा आहे.

मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आज पर्यत अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत. भविष्यात अधिक गतीने राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर रहाणार -अमरजीत साळुंके पाटील

तालुका प्रतीनिधी

याप्रसंगी सोलापूर जि.प.अध्यक्ष मा.अनिरुध (अण्णा) कांबळे, पै.पृथ्वीराज पाटील, युवा नेते अजित तळेकर, भाजपा अध्यक्ष जगदिश अगरवाल, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिपक चव्हाण, बंडु माने,आदींनी आपले विचार व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या रक्तदान प्रसंगी यावेळी पत्रकार अण्णा काळे, सरपंच विजय साळुंखे, उपसरपंच अतुल पाडसे, ज्ञानेश पवार, उद्योगपती अशोकशेठ चोपडे, दिंगबरराव साळुंखे,युवा नेते संग्रामसिंह साळुंखे, भैय्या मंगवडे, बिटुदादा फरतडे, वसंत साळुंके, राहुल चव्हाण, जयसिंग साळुंखे, राजेंद्र साळुंखे, हरिशचंद्र साळुंके सर, अर्जुन मुटेकर, किशोर साळुंके, इंद्रजित साळुंके, प्रमोद साळुंके, लखन चिर्के, भास्कर साळुंके, रामेश्वर मेटे, भैरू मुरूमकर, राजाभाऊ गावडे, दिपक गाडे, किरण गाडे , ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मित्रपरिवार व सातोली ग्रामस्थ उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts