loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखलठाण हे गाव "विकासाचे रोल मॉडेल" म्हणुन ओळखले जाईल -आ. संजयमामा शिंदे

चिखलठाण गाव करमाळा तालुक्यात "विकासाचे रोल मॉडेल" म्हणुन ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे केले आहे. ते चिखलठाण येथे ग्रामपंचायतीचे नुतन कार्यालय व विविध विकासकामांच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी व्यासपीठावर चिखलठाण चे सरंपच व कृषी उत्पन्न बाजार समिति चे संचालक चंद्रकांत (काका )सरडे यांच्या सह युवा नेते शंभुराजे जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य वामनदादा बदे मा जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, काँग्रेस आय चे तालुका अध्यक्ष दादासाहेब लबडे 'कंदरचे सरपंच भास्कर आण्णा भांगे' नगरसेवक कन्हैयालाल देवी ' माजी संचालक तानाजीबापु झोळ' सुनिल बापु सावंत ,उपसरपं आप्पासाहेब सरडे ,माजी उपसरपंच अमोल मराळ ,यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

आ संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली चिखलठाण चा चेहरमोहरा बदलणार आहे. सध्या गावातील सर्व समाज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, गावातील बंदिस्त गटारी, हायमास्ट दिवे यांची कामे पुर्ण झाली असुन येत्या काळात गावांतर्गत सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करणार आहोत..- सरपंच चंद्रकांत (काका) सरडे

सा करमाळा चौफेर (चिखलठाण प्रतिनीधी)

या वेळी अधिक बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की चंद्रकांत (काका )सरडे एक उच्च शिक्षित नेतृत्व असुन चिखलठाण सह परिसरातील गावच्या विकासासाठी ते सतत पाठपुरवा करत असतात. सुशिक्षित व खंबिर नेतृत्वा कडे सत्ता असल्यास विकास कामे मंजुर करणे व ती प्रभावी पणे राबीवणे सोपे जाते हेच चिखलठाण च्या विकास कामामुळे दिसुन येते आहे. भविष्यात चिखलठाण हे गाव करमाळा तालुक्यात "विकासाचे रोल मॉडेल ठरेल "असे गौरोद्गारही आ. संजयमामा शिंदे यांनी काढले. तसेच आगामी काळात चिखलठाण च्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करु असे आश्वासन दिले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

चिखलठाण येथे नुतन ग्रामपंचायत व विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts