कुकडीचे पाणी सिना कोळेगाव धरणात सोडावे या मागणीसांठी परांडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करत असुन गरज भासल्यास राज ठाकरे यांची भेट घेवुन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे जनांदोलन उभारणार असल्याची माहिती मनसे तालुका कार्यकर्ते विश्वनाथ पाटील यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना दिली.
निम्मा पावसाळा संपला तरी करमाळा तालुका व परांडा तालुक्या साठी वरदान ठरत असलेले सिना कोळगाव धरण अद्याप देखील पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. नगर व धाराशीव जिल्हयात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याशिवाय धरण भरण्यास असलेला दुसरा पर्याय म्हणजे "कुकडीचे ओव्हर फ्लो पाणी सिना कोळगाव धरणात सोडणे"
सिना कोळेगाव धरण हे करमाळा व परांडा तालुक्या साठी वरदान आहे असे म्हटले जात असले धरण निर्मीती पासुन उनेपुरे दोन वेळा भरले आहे. पावसाच्या पाण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याने हे धरण पुर्ण क्षमतेने भरत नाही. या साठी कुकडी चे व उजनीतुन दहिगाव मार्गे ओव्हर फ्लो पाणी धरणात आणणे गरजेचे आहे. परंतु सरकार या कडे गांभीर्याने पहात नाही या साठी मोठ्या जनांदोलनाची गरज आहे -विश्वनाथ पाटील (मनसे कार्यकर्ते परांडा)
या मागणी साठी परांडा व करमाळा तालुक्यातील जनता वारंवार मागणी करत आसताना सुद्धा या भागातील लोकप्रतिनीधी मात्र जाणीवपुर्वक कानाडोळा करत आहेत असेच चित्र निर्माण झाले आहे परांडा तालुका महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतिने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, जिल्हाधिकारी तसचे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या कडे पत्र व्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरवा सुरु आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.