ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे तालुका संपर्क प्रमुख विलासराव देलताडे यांनी प्रांताधिकारी ज्योती कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात धनगर समाजाच्या एस. टी आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करावी, तसेच एस टी आरक्षण लागु केल्या शिवाय नोकरीची मेघाभरती करु नये, विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे पडताळणी निकालात काढावी, मेंढीला राष्ट्रीय पक्षु चा दर्जा मिळावा, आहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, मेंढ्या चारण्यासाठी वने आरक्षीत करुन मेंढपाळांना पास उपल्बध करुन द्यावेत ,मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले लक्षात घेता त्यांना शस्त्रं परवाना द्यावा, अहिल्याबाई होळकर आवास योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात, शेळी मेंढी विकास महामंडळाचा एकहजार कोटीचा निधी मेंढपाळांना वाटप करावा ,घोंगडी व्यवसाय अत्यंत अडचणीत असुन घोंगडी उत्पादकांना अर्थसाह्य उपल्बध करुन द्यावे इत्यादी प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सदरचे निवेदन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, जिल्हा प्रभारी संजय नाईकवाडे ,जिल्हासंपर्क प्रमुख बाळासाहेब टकले तालुका अध्यक्ष आण्णासाहेब पांढरे यांच्या मार्गदर्शना खाली देण्यात आले.
या मागण्यांसाठी धनगर समाज बांधव अनेक दिवसापासून सनदशिर मार्गाने पाठपुरावा करत आहे पंरतु सरकारकडुन धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत आहे. या मागण्यासांठी सरकारने सकारात्मकता न दाखवल्यास ऑल इंडिया धनगर समाज महासंघ राज्यभर तिव्र आंदोलन करेल -विलासराव दोलताडे (तालुका संपर्क प्रमुख)
या वेळी अभिजित सोंलकर, बाहुबली देशमाने, संदिप शेळके, सागर होनमाने, व इतर समाज बांधव उपस्थित होते
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.