loader
Breaking News
Breaking News
Foto

सुप्रिया सुळे यांचा राज ठाकरे, फडणवीस यांच्या सुरात सुर

राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर विविध गोष्टी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यांतर्गत एसटी बस सेवाही आजपासून सुरू होत आहे. मात्र, व्यायामशाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळं जिम चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं जिम व तालीम उघडण्यास परवानगा देण्याची मागणी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना याच संदर्भात पत्र लिहिलं होतं. दारूची दुकानं सुरू होतात, पण जिम बंद आहेत हे दुर्दैव आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर लॉकडाऊन झुगारून जिम उघडण्याचं आवाहन जिम चालकांना केलं होतं. सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला असून ट्वीटरच्या माध्यमातून जिम चालकांची, व्यायामपटूंची आणि प्रशिक्षकांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. मुंबईतील एका जिम चालकानं लिहिलेलं पत्रही त्यांनी ट्वीट केलं आहे.

वैभव फरतडे -(मुंबई प्रतिनिधी )

माजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नंतर खा सुप्रिया ताई सुळे यांनी जिम व तालीम शाळा बाबत केलेल्या मागणी मुळे जिम मालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अनलॉक मुळे जिम मालकांना जागेचे भाडे, विज बिल याचा अर्थिक भुरदंड सोसावा लागत आहे. जिम ला परवानगी दिल्यास जिम मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे '

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts