कृष्णानदीला पूर आल्याने पुराचे पाणी हे दुष्काळी कवठेमहांकाळ, जत,सांगोला तालुक्याला सोडण्याचा निर्णय मा जलसंपदा मंत्र्यांनी घेतला,खर तर हा योग्य व दुष्काळी जनतेची तहान भागवणारा निर्णय होता, करमाळा तालुका व व तालुक्यातील पुर्व भाग देखील अशाच पद्धतीने दुष्काळी पिण्याच्या पाण्याची भ्रांत असणारा तर पश्चिम भाग हा उजनी सारख्या जलसागराने व्यापलेला व ऊस,केळी च्या हिरवाईने पुर्व भागाच्या कडेच्या गावामधून जाणाऱ्या सीना नदीच्या काठावर साधारणतः पंधरा वर्षापूर्वी कल्याण सागर (सिना कोळगाव धरण) हे साधारण सहा टीएमसी चे धरण करमाळा व मराठवाड्यातील परंडा तालुक्याच्या सीमेवर बांधले आहे,
परंतु आजतागायत पाच-सहा वर्षे सोडली तर नेहमी कोरडेठाक हे पहायला मिळतं, मूळतःच पर्जन्यमान कमी असलेल्या नगर पारनेर पासून सीना नदीचे उगमस्थान असल्याने नगरच्या पावसाने दोन -तिन वेळाच हे धरण भरू शकले त्यातही पाच वर्षापूर्वी जामखेड तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे दोन टीएमसी चे धरण बांधल्याने वरून येणाऱ्या पाण्याची आशा न बाळगलेलीच बरी अशी अवस्था आहे, अशा अवस्थेत धरण फक्त नावासाठीच आहे की काय असा समज पहायला मिळतो, निसर्गाच्या अवकृपेने धरण हे भरू शकत नाही हे लक्षात आल्याने मध्यंतरी कुकडी चे ओव्हर फ्लो झालेलं पाणी हे कुकडीच्या कालव्यातून निमगाव गांगर्डे येथील धरणात व तेथून सीना कोळगाव येथे सोडण्याची मागणी झाली त्यासाठी शाहूदादा फरतडे यांनी तर कोळगाव ते मंत्रालय असा मोर्चा देखील काढला,त्यासोबतच धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष सतीशबापू नीळ यांनी वारंवार निवेदन दिले परंतु हे काही एका दोघांचे काम नाहीये व त्यास योग्य जनरेटा नसल्याने पुढे काहीच हालचाली दिसून आल्या नाहीत,तसेच मराठवाड्यासाठी राखीव एकवीस टीएमसी चे पाणी उजनी द्वारे कोळगाव धरणात व तिथून पुढे लातूर ला सोडण्याचा निर्णय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना झाला होता मात्र त्याच देखील काम हे कासवगतीने चाललेय व अजून कमीतकमी दहा वर्षे पूर्णत्वाला जाईल याची खात्री नाहीये,
तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मानसिकता देखील हा पूर्व भाग मागास च रहावा अशीच राहिली आहे, मताचा जोगवा मागताना जनतेची भूकच लक्षात न आलेले लोकप्रतिनिधी तरी काय कामाचे हा सवाल आता प्रत्येकाला पडू लागलाय, आपल्या तालुक्यातील पश्चिम भागातील पुढारी,नेते हे राजकारणापूरते राजकारण करतात व इतर वेळी पाण्यासाठी एकत्र लढलेले आपण पाहिलेले आहेत कारण घर नीट असेल तर गाव नीट राहत हे त्यांना लक्षात आलं आपण मात्र अजून एकमेकांना पाडापाडीत च रस मानत आहोत, पिढ्या न पिढ्या अठराविश्व दारिद्र्य हे जोपर्यंत आपल्या रानात पाणी खेळणार नाही तोपर्यंत सुटणार नाहीये परंतू त्यासाठी गरज आहे आपल्यातील सर्वपक्षीय एकीची, चळवळीची,अन आपल्या पुढच्या पिढीला कायमस्वरूपी पाणी मिळवून देणाऱ्या जनआंदोलनाची
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.