loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रेरणा

तूच माझा श्वास अविरत तूच माझी प्रेरणा , सख्या आवडे मज तुझा त्यागनिष्ठ,दिलदार बाणा ||१|| ओलांडले माप मी लक्ष्मीच्या पावलांनी , साथ तुझीच मागते रे सौभाग्य चिंतते मनी ||२|| लालभडक कुंकूमचीरी शोभते भाळावरी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

, तुझ्या सुखाचाच गुणाकार सदैव माझ्या ह्रदयांतरी ||३|| भासतोस मला सख्या चंदनकंद विठूराया, जिद्दीने चालते मी पुढे पाठीशी तुझी भक्कम छाया ||४|| सात जन्म फुलत राहो तुझी अन् माझी प्रीती, मिळावी अखंड प्रेरणा उजळाव्या जीवनज्योती ||५||

मंजिरी अविनाश देशमुख

सौ.मंजिरी अविनाश जोशी, करमाळा.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts