loader
Breaking News
Breaking News
Foto

ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या साट्यालोट्यामुळे जलजीवन मिशन योजना रखडली! चौकशीची मागणी

करमाळा तालुक्यातील १०४ गावांचा व वाड्यावस्त्यांवरील पाणी प्रश्न मिटण्यासाठी . जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील गावांसाठी 94 कोटी 29 लाख निधी मंजूर झाला असला तरी अद्याप पर्यंत बोटावर मोजण्याईतपत गावात जलजिवन चे काम सुरु झाले आहे. पावसाळा तोंडावर आला तरी अनेक गावात या कामाचा शुभारंभ झाला नसून पाणीपुरवठा अधिकारी अधिकारी याकडे गांभीर्यपूर्वक पाहायला तयार नाहीत. प्रभारी गटविकास अधिकारी तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांची या कामास गती मिळविण्यासाठी बैठक झाली मात्र ति बैठक फक्त फार्स ठरली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

वाडीवस्तीवरील नागरींकाना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून करडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र ठेकेदार व अधिकारी तसेच ग्रामपंचायत पदाधीकारी यांच्या टक्केवारीचा हिशोब जुळत नसल्याने अनेक गावात जलजिवन चे काम रखडले आहे अशी चर्चा सुरु आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

एकाच ठेकेदाराकडे अनेक गावांची कामे दिली गेली आहेत त्यामुळेच हि कामे रखडली आहेत मात्र ठेकेदार व अधिकारी यांच्या मध्ये मिलीभगत झाल्याने अनेक कामांचा नारळ फुटला नाही तसेच काम सुरु असलेल्या गावात काम नियमबाह्य पद्धतीने होत नसलेल्या देखील तक्रारी समोर येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे केंद्र सरकारकडून हजारो कोटी खर्च करून राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजनेला ठेकेदार व अधिकारी यांच्या साट्यालोट्यामुळे गालबोट लागत असुन याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts