करमाळा आगारातील एस टी च्या (ET )टिकीट मशीन बंद पडत असल्याने ऐनवेळेस वाहकांना सर्कस करावी लागत आहे. टिकीट काढतानाच मशीन बंद पडत असल्याने प्रवाशी व वाहकांना देखील मनस्ताप होत असून बुकिंग करण्यास उशीर होत असल्याने एस टीचे वेळापत्रक देखील बिघडत चालले असून लांबपल्ल्याच्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा एक ते दोन तास उशीरापर्यंत सुटत आहेत.
सध्या लग्नसराई व सुट्ट्यांचे दिवस आहेत ,महिलांना हाप टिकीट तसेच जेष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास असल्याने महिला व जेष्ठ नागरिक यांच्याकडून एस टी प्रवासास प्राधान्य दिले जात असल्याने बस आगर गजबजून जात आहे.मात्र टिकीट मशीन मध्ये बिघाड होत असल्याने दोष नसलेल्या मशीन उपलब्ध होईपर्यंत किमान एक ते दोन तास एस टी बस लेट होत आहेत त्यामुळेच महिला प्रवासी जेष्ठ नागरिक विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वाहकामधून देखील या मशीन बाबत वारवंवार तक्रार करून देखील मशीन बदलून दिल्या जात नसल्याने संतप्त भावना आहेत. मात्र आगार व्यवस्थापनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
एसटी कंडक्टरने नाव न छापण्याच्या अटिवर सांगीतले की मशीन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही त्या एक-दोन तास देखील चालत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही बॅटरी बदलून मशीन चालवण्याचा प्रयत्न केला. यानंतर एसटी महामंडळानेही काही मशीनच्या बॅटऱ्या बदलल्या. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. आता मशीन हँग झाल्यामुळे तिकीट अडकून पडल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट वितरित होत नाही. त्यामुळे ही समस्या कायमची सोडवण्यासाठी अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून द्याव्यात .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.