loader
Breaking News
Breaking News
Foto

नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदाना पासुन शेतकरी अजुनही वंचित! 'राजाने मारले अन् पावसाने झोडपले'  दाद मागायची कुणाकडे? 

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील उडीद, सूर्यफूल, मका, केळी ,द्राक्षे भाजीपाला फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. पंचनाम्या नंतर जवळपास सहा महिन्यानंतर ४८ कोटी रूपयांचे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे .  सहा महिन्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली खरी  मात्र   यादीत नाव असूनही  तालूक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आधार नंबर च्या चुका, बॅंक खाते क्रमांक चुकीचा,  तर कुठे शेतकऱ्यांचे नाव चुकल्याने  अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही .  अजुनही नुकसान ग्रस्त शेतकरी बॅंकेत, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालयात हेलपाटे मारून बेजार होत  आहे.मात्र एकाही ठिकाणी ठोस असे समाधानकारक उत्तर शेतकऱ्यांना मिळत नाही. 

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अतिवृष्टीत यादीत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यापूर्वी  पुन्हा एकदा मे महिन्यात झालेल्या अवकाळीचा फटका बसला आहे मात्र अजून नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पैसे नाहीत मग नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पैसे मिळतील का? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे .

प्रधानमंत्री  किसान सन्मान योजनेचा देखील बट्ट्याबोळ=    प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा करमाळा येथे बोजवारा उडाला असून जिवंत असलेले शेतकरी मृत दाखवले गेले आहेत, तर अनेक शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड गायब झाल्याने त्यांना पुन्हा सातबारा उतारा, फोटो आधार कार्ड घेऊन येण्यास सांगीतले जात असून अनेक वयोवृद्ध शेतकरी वर्षभरापासून तहसिल ऑफिस मध्ये खेटे घालत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

 बॅंक कर्मचारी, तहसिल ऑफिस तलाटी कार्यालयात  उडवा उडवीची उत्तर मिळत असल्याने खजील झालेल्या शेतकऱ्याची अवस्था 'राजाने मारले अन् पावसाने झोडपले' तर दाद कुणाकडे मागायची अशी झाली   आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या भोंगळ कारभारा विरोधात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts