loader
Breaking News
Breaking News
Foto

मोरवड येथील जिल्हापरिषद शाळेच्या शौचालयाचे काम निकृष्ट ठेकेदारांवर कारवाईची मागणी

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी तसेच विद्यार्थांचे आरोग्य व शिक्षण सुधारण्यासाठी शासन वित्त आयोगातुन लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र या निधीचा खरंच सदुपयोग होतो का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मोरवड ता करमाळा येथील मोहोळकर वाडी जिल्हापरिषद वस्ती शाळेच्या शौचालयाच्या कामासाठी वित्त आयोगातुन एक लाख रुपयांचे शौचालय मंजूर झाले असून या शौचालयाचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे.या मुळे पालक व शाळा व्यवस्थापन समीती यांनी तिव्र संताप व्यक्त केला असून झालेल्या कामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदाराकडून संपूर्ण काम पुन्हा करून घ्यावे व अशा ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

=ठेकेदाराच्या भ्रष्टाचारावर पांगरूण घालण्याचा प्रयत्न झाल्यास आत्मदहन करणार= मोहोळकर वाडीवर वस्ती शाळा टिकविण्यासाठी आम्ही अंत्यत प्रयत्न केले आहेत आम्ही लोकवर्गणी करून शाळेस खुर्च्या, अंगणवाडीस कार्पेट रंगकाम केले आहे भविष्यात देखील स्वखर्चाने शाळेचा विकास करणार आहोत मात्र ठेकेदाराकडून शासनाच्या पैशावर डल्ला मारूण विद्यार्थांच्या शौचालायत देखील पैसे खाण्याचे पाप होत आहे ठेकेदाराच्या या कृत्यास पाठीशी घातल्यास वेळप्रसंगी अत्मदहन करू. छगन मोहोळकर (उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समीती)

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या संदर्भात शाळा व्यवस्थापन समीती उपाध्यक्ष छगन मोहोळकर यांनीमोरवड ता करमाळा येथील मोहोळकर वाडी जिल्हापरिषद वस्ती शाळेच्या शौचालयाच्या कामासाठी वित्त आयोगातुन एक लाख रुपयांचे शौचालय मंजूर झाले असून या शौचालयाचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे.या मुळे पालक व शाळा व्यवस्थापन समीती यांनी तिव्र संताप व्यक्त केला असून झालेल्या कामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदाराकडून संपूर्ण काम पुन्हा करून घ्यावे व अशा ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून मोहोळकर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की शौचालयाचे काम करताना ठेकेदार यांने निकृष्ट दर्जाची कचखडी अंत्यत ढिसाळ झालेल्या विटांचा वापर केला आहे. तसेच नियमा प्रमाणे पाय न खोदता वरचेवर फाऊंडेशन तयार केले आहे.पत्र्याच्या शेडला आधार म्हणून लोखंडी अँगल ऐवजी वेळुचा बांबू वापरण्याचा प्रताप ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. मात्र तक्रार दिल्यानंतर बांबू काढून लोंखडी अँगल बसवले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गटविकास अधिकारी यांनी तक्रारदारांच्या अर्जाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागास चौकशी करण्याचे आदेश दिले होते या नंतर जिल्हापरिषद बांधकाम विभाग अभियंता दिलीप गौंडरे ,उपअभियंता देवकर यांच्यासह ग्रामसेवक यांनी कामाची पाहणी केली आहे . या वेळेस ढिसाळ झालेल्या विटा , अर्धवट पाया ,अढळुन आला आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts