loader
Breaking News
Breaking News
Foto

सोलापूर युवासेनेची आज सेना भवन येथे महत्वपूर्ण बैठक वरूण सरदेसाई करणार मार्गदर्शन !

सोलापूर जिल्हा युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी दोन वाजता मुंबई येथील सेनाभवन येथे होणार असून युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती युवासेना सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांनी दिली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तातडीने बोलावलेल्या या बैठकीस युवासेना जिल्हा युवा अधिकारी, जिल्हा समन्वयक ,जिल्हा सचिव ,तालुका युवा अधिकारी, शहर युवा अधिकारी यांसह काॅलेज कक्ष, सोशल मिडीया चे पदाधिकारी देखील उपस्थित रहाणार आहेत .

शंभुराजे फरतडे ✍

या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा अवहाल घेतला जाणार असून आगामी जिल्हापरिषद पंचायत समीती निवडणूका , संघटन बांधणी या संदर्भात कानमंत्र देण्याची शक्यता आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शिवसेनेत झालेल्या गद्दारी नंतर देखील जिल्ह्यातील विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचे जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांनी योग्य नियोजन करून पहिल्यांदाच दणदणीत विजय मिळवला होता. सध्या सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सांगोला ,माळशिरस ( अकलुज) या ठिकाणी युवासेना पुर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. बैठकीस प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सेनाभवन मधून निरोप दिले गेल्याने मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी मुंबई ला रवाना झाले आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts