loader
Breaking News
Breaking News
Foto

मुदत संपुन सहा महिने झाले तरी काम अपूर्ण! दर्जा हि निकृष्ट ?

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतुन कुंभेज ते गुळसडी( चौगुले वस्ती) या सहा किलोमीटर रस्त्याचे काम सुरु असुन भाग्यश्री कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम दिले आहे मात्र मुदत संपून तिन महिने उलटले तरी तिस टक्के देखील काम पुर्ण झाले नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

एकीकडे काम ढिम्या गतीने सुरु आहे तर दुसरी कडे कामाच्या दर्जा बाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . कुठे रूंद तर कुठे अरुंद अशा प्रकारे काम झाले आहे.त्याचबरोबर साईडने चाऱ्या काढणे गरजेचे असताना एकही चारी काढली नसल्याने बाजुंच्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.जवळपास चार ते पाच कोटी एवढा निधी या रस्त्यावर खर्च होत आहे मात्र ढिम्या व निकृष्ट कामामुळे या रस्त्याचे भवितव्य अंधातरी बनले आहे.मुदतीत काम पुर्ण झाले असते तर गुळसडी, कुंभेज या गावातील नागरिकांचा तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा प्रवास सुखकर झाला असता मात्र पावसाळा तोंडावर आला तरी प्रशासन व ठेकेदार कंपनी यांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

या कामावर देखरेख करण्यासाठी असलेले असलेले अधिकारी (जेई) यांनी कंपनीच्या हलगर्जी व दिरगांई पणा कडे दुर्लक्ष केल्याने कंपनीकडून हे काम पुर्ण करण्यास चालढकल करण्यात आली असून संबंधित कंपनीस मुदतवाढ न देता सदर कामाची निविदा रद्द करून दंड वसूल करावा व दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts