loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी केंद्राचे फुटले पेव , शेतकऱ्यांच्या फसवणुकीची शक्यता कृषी विभागाचे दुर्लक्ष

करमाळा तालुक्यात सध्या केळी ,द्राक्ष, डाळिंब पिकांचे भरमसाठ उत्पादन होत असल्याने जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेक रासायनिक खतांची मागणी होत आहे .त्या अनुषंगानेच कृषी केंद्राचे पेव फुटले असून या कृषी केंद्रातुन विना पावती खतं दिली जात आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कित्येक कंपन्यां विना परवाना खतनिर्मिती तसेच कीटकनाशके तयार करून बाजारात बिनधास्त विकतात त्यामध्ये त्याना नफा अधिक मिळत असल्याने हे प्रकार सुरु आहेत तसेच सेंद्रिय औषधांच्या नावाखाली देखील भरमसाठ विक्री सुरु आहे यातुन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे .गेल्या काहि वर्षांत बोगस बियाणे, खतांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असून त्यामुळे उत्पादनात बरोबर शेतीची देखील मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.मात्र कृषी कार्यालयातून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का असा सवाल विचारला जात आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

एकीकडे बोगस कृषी साहित्य विकणाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मात्र ससेहोलपट केली जात आहे. शेतकऱ्यांना बांधावर जावुन मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना कृषी विभागातील अधिकारी मिटींग च्या नावाखाली गैरहजर असतात, मंडल अधिकारी मंडलात उपस्थित नसतात कृषी योजनेतुन लागलेले ट्रकट्रर, ठिबक, अनुदान साठी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत मागणी केली जात आहे. तसेच चढ्या दराने खताची विक्री करण्यासाठी मंथली सुरु असल्याची देखील चर्चा आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

तपासण्या चालु असल्याचे दाखवण्यासाठी फक्त दरपत्रक, लावले,नाही ,बोर्ड लावले नाही या किरकोळ बाबींसाठी नोटिसा काढून कारवाई केल्याचा कांगावा केला जात आहे. या सर्व गैर प्रकाराची वरिष्ठांकडून चौकशी केली जावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts