loader
Breaking News
Breaking News
Foto

पै राहुल आवारे अखेर

क्रीडापटूंसाठी अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या आर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीपटू पै राहुल आवारे याची२०१९मध्ये भारतीय कुस्ती महासंघ यांच्याकडून त्याची शिफारस करण्यात आली होती राहुल आवारे हा मुळचा बिड जिल्ह्यातील पाटोदा गावाचा सुपूत्र असुन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे वस्ताद चा मल्ल,रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्रर बिराजदार ,काकासाहेब पवार यांचा शिष्य आहे. आता पर्यंत त्याने राष्ट्रकुल सुवर्णपदक ,जागतिक कांस्यपदकावर मोहोर उमटवली आहे. सध्या तो पोलीस उपाधिक्षक पदावर (Dysp काम करत आहे. आज पैलवान राहुल बाळासाहेब आवारे याला आज केंद्र सरकार चा क्रीडा क्षेत्रातील मानाचा "अर्जुन" पुरस्कार जाहीर झाला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गतवर्षी गुण पूर्ण असुनही राहुल या सन्मानापासून वंचित होता. यावर्षी मात्र राहुल च्या उण्यापुऱ्या पंधरा वर्षाच्या वर्षाच्या कारकिर्देला न्याय मिळाला. पै राहुल आवारे याला अनेक वेळा अन्यायाचा सामना करावा लागला पंरतु केवळ गुरूंच्या संस्काराच्या आधारावर व .नित्य नियमित आपल्या ध्येयाची पूजा करत राहुल एक नव्हे,दोन नव्हे अखंड पंधरा वर्षे कुस्ती क्षेत्रात गरुडभरारी मारत राहिला. या वर्षी मात्र राहुल आवारे अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरला ही तमाम महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पै राहुल आवारे यांचे माजी आमदार नारायण आबा पाटिल, महाराष्ट्र केसरी चंद्रहास बापु निमगिरे डबल उपमहाराष्ट्र केसरी छत्रपति पुरस्कार विजेते तथा पंचायत समिति सदस्य पै अतुल पाटील ,महाराष्ट्र चॅम्पियन तथा पंचायत समिति उपसभापती पै दत्ता सरडे आदिंनी अभिनंदन केले आहे

वैभव फरतडे (मुंबई प्रतिनिधी)

सामान्य कुटुंबातून आलेल्या राहुल आवारे ला मिळाले कष्टाचे फळ - महाराष्ट्रासह देशाच्या कुस्ती क्षेत्रात आनंदाची लाट पसरली आहे.राहुल आवारे याला खा शरदचंद्र पवार यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts