वीट ते करमाळा जोडला जाणारा पुर्वीचा जुना प्रमुख रस्ता हा नकाशामध्ये गट नं ५३ मध्ये दाखवत असुन त्यावेळेस शेतकऱ्यांच्या निरक्षर पणाचा फायदा घेऊन ठराविक लोकांची जमीन वाचवण्यासाठी आमच्या ११९ व १२० गट नंबर मधून नेला आहे , नकाशावरील रस्ता व सध्याचा रास्ता याची महसूल विभाग, भुमीअभिलेख व बांधकाम विभाग यांनी एकत्रित पणे स्थळ पाहणी व पंचनामा करून आम्हला लेखी अहवाल द्यावा व सध्या सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी अगोदर जमीनीचे संपादन करावे व आमच्या जमीनीचा मोबदला द्यावा या प्रमुख मागणीसाठी वीट येथील शेतकऱ्यांकडून शुक्रवार दिनांक १० रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते, मात्र आज महसूल विभाग बांधकाम विभाग, भुमीअभिलेख यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न देता रस्ता आडवाल तर शासकीय कामात अडथळे आणल्याचे गुन्हे दाखल करू असे सांगत आंदोलन दडपण्यात आले.याच रस्त्याचे सध्या रुंदीकरण करण्यात येत असून एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम सुरु आहे. सध्या होत असलेल्या रस्ता रुंदीकरण मध्ये आमच्या कुटुंबातील शेतकऱ्यांची पाच ते साडे पाच एकर जमीन जात असून अगोदर जमीन संपादन करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही कोर्टात धाव घेतली आहे स्टे येई पर्यंत काम थांबवण्याची वृद्ध आंदोलक शेतकऱ्यांकडून विनवण्या केल्या जात होत्या मात्र एन पी कन्स्ट्रक्शन कंपनी व बांधकाम विभाग यांनी जास्तीत जास्त बुधवार पर्यंत आम्ही थांबू नाहीतर पोलीस बळ वापरून रास्ता करू असा सज्जड दम शेतकऱ्यांना दिला.
शेतकऱ्यांकडून पाच ते सहा दिवस अगोदर तहसीलदार भुमीअभिलेख पोलीस निरीक्षक यांना रास्ता रोको करणार असले बाबत निवेदन सादर करण्यात आले होते मात्र तहसिल विभाग भुमीअभिलेख बांधकाम विभाग यांच्याकडून काही एक उत्तर दिले गेले नाही तहसिल विभागाकडून सर्कल बागवान उपस्थित होते त्यांनी निवेदन स्विकारले मात्र साठ वर्ष तुम्ही झोपला होता का ?असा सवाल करून शेतकऱ्यांची थट्टा केली.
कंपनी व बांधकाम विभागाकडून ठराविक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते पुढारी व त्यांची बघलबचच्चे यांना काही ठिकाणी रस्ताचे काम तोडून देणे,पाण्याचे टँकर लावणे, मुरुम वाहतूक साठी टिपर भाड्याने लावणे असे प्रकार केल्याने सर्व सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.