loader
Breaking News
Breaking News
Foto

आगोदर जमीनीचे पैसै द्या मगच रस्ता करा ! एन पी कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात वीट येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन .

कोर्टी ते आवाटी राज्यमार्ग क्रमांक ६७ च्या रस्ता नूतनीकरणाचे काम सुरु असुन या रस्त्याच्या कामासाठी जमीनीचे संपादन अथवा मोजणी न करता अनाधिकारने रस्त्याचे काम सुरु असुन ते तात्काळ थांबवून अगोदर जमीनीचा मोबदला द्यावा व नंतर रस्त्याचे काम सुरु करावे या मागणी साठी वीट ता .करमाळा येथील शेतकरी अक्रमक झाले असून शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी वीट येथील मुख्य चौकात संपुर्ण परिवारासह रास्ता रोको करणार असल्याचा लेखी इशारा शेतकऱ्यांकडून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की आमच्या 119 व 120 गटाच्या शेजारीच असलेल्या गट नं 53 मधुन पुर्वीचा जुना वीट व करमाळा रस्ता दाखवत असुन त्यावेळेस आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या निरक्षर पणाचा फायदा घेऊन हाच नकाशावरील गट नं 53 मधील रस्ता आमच्या 119व 120 गट नंबर मधून नेला आहे. व आत्ता याच रस्त्याचे नव्याने रुंदीकरण व दुरुस्ती करण सुरु केले असुन या साठी कोणतीच मोजणी अथवा संपादन न करता अनाधिकृत पणे आमच्या दोन ते तीन एकर शेतामध्ये अतिक्रमण करून हा रस्ता बळजबरीने नेहण्याचा प्रयत्न केला जात आहे.यासाठी आम्ही कोर्टात स्टे आणण्यासाठी दावा दाखल केला असून कायदेशीर प्रकिया करत आहोत परंतु स्टे येण्या अगोदर रस्त्याचे कामकाज थांबवावे आशी मागणी आम्ही एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे करून देखील ते मनमानी पणे काम करत आहेत हा आमच्यावर अन्याय असून सार्वजनिक बांधकाम विभाग , तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन पुर्वीच्या रस्त्याच्या मुळ नकाशाची प्रत घेऊन व प्रत्यक्षात स्थळ पाहणी करावी व आम्हाला न्याय द्यावा आशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, बांधकाम विभागाचे उबाळे साहेब यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर अजिनाथ दिंगबर जाधव, माणिक दिंगबर जाधव, मच्छिंद्र दिंगबर जाधव, नवनाथ जाधव, पोपट जाधव अंकुश जाधव आदींच्या सह्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हा रस्ता पुर्ण करण्यासाठी या कंपनीस दिलेली मुदत देखील अगोदरच संपुन गेलेली आहे. काम रेंगाळाल्याने उस उत्पादक शेतकरी, दुचाकी स्वार यांचे अपघात होऊन अनेकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अवजड पद्धतीने मुरुम वाहतूक केल्याने सौंदे,साडे,गुळसडी, शेलगाव या गावांचे रस्ते उद्ध्वस्त केले आहेत मात्र तरी देखील या कंपनीस प्रशासनाकडून पाठीशी घालण्याचे प्रकार घडत असुन विद्यमान आमदार तसेच प्रमुख विरोधी गटाकडून देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहेत. वीट येथील शेतकऱ्यांना न्याय मिळनार की आंदोलन दडपले जाणार या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts