loader
Breaking News
Breaking News
Foto

आपल्या पतीची आठवण म्हणून विधवा महिलांनी कुंकू लावावे- अंजली श्रीवास्तव

गौंडरे ता करमाळा येथील धर्मविर संभाजी विद्यालयात परंपरेनुसार हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येतो मात्र या वर्षीचा कार्यक्रम आनोख्या पद्धतीने घेण्यात आला. विधवा महिलांना देखील समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी विधवा महिलांना हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला .या वेळेस विधवा महिलांनी आपण आपल्या मयत पतीच्या आठवणीसाठी कपाळावर कुंकू लावावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या व जेष्ठ साहित्यिक अंजली श्रीवास्तव यांनी केले .या वेळेस अंजली श्रीवास्तव यांच्या हस्ते अनिता गणपत चवरे व वैशाली हरिचंद्र गायकवाड या विधवा महिलांना हळदी कुंकू लावत त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

हळदी कुंकू बरोबरच महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी होम मिनीस्टरच्या धर्तीवर महिलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये कापसाच्या वाती बनवने, स्माईली बॉल, फुले जमा करणे, लिंबू चमचा व संगित खुर्ची असे पाच प्रकारचे खेळ घेण्यात आले. या पाचही खेळांमधिल विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये 1) प्रथम विजेती महिला सौ.भारती सुरेश माने हिचे बक्षीस महाराष्ट्राची मानाची पैठणी2) दुसरी बक्षीस विजेती सौ.निता अतुल निळ हिस सोन्याची नथ 3) तिसरे बक्षीस विजेती सौ.मोहिनी अनिल अंबारे हिस चांदीचा करंड 4) चौथे बक्षीस विजेती सौ.अश्विनी अनिल शिंदे हिस फुलदानी5) पाचवे बक्षीस सौ.विशाखा भाऊसाहेब खंडागळे हिस फुलदानी याबरोबरच इतर खेळात भाग घेतलेल्या महिलांनाही प्रोत्साहन म्हणून स्वयंपाकघरातील ताट बक्षीस म्हणून देण्यात आले.

✍ चौफेर प्रतिनीधी

या कार्यक्रमाबरोबरच शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून शाळेत लोकवर्गणीतुन पाणी फिल्टर बसवण्यात आला. या पाणी फिल्टरच्या उद्घाटनास करमाळा पंचायत समितीचे अध्यक्ष व डबल उपमहाराष्ट्र केशरी श्री.अतुल पाटील, गौंडरे गावचे उद्योजक श्री.गोविंद हनपुडे, कोळगाव गावचे माजी सरपंच श्री.अनिल शिंदे व सर्प मित्र माधव हनपुडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालक व उत्क्रूष्ट अँकर म्हणून म्हणून याच विद्यालयातील माजी विद्यार्थी कु.प्रसाद भिल व सौ.सारिका चेंडगे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सौ.प्रतिभाताई गोविंद हनपुडे, मा.अंजली श्रीवास्तव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांचे आभार शाळा व्यावस्थापन समितीच्या उपअध्यक्ष सौ.अश्विनी निळ यांनी मानले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts