loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री शिंदे च्या हस्ते मोळी टाकलेला आदिनाथ अजून बंदच! शेतकऱ्यांतुन नाराजीचा सुर

बारामती ॲग्रो सोबत भाडेतत्त्वावर करार झालेला करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला मात्र अजून उसाचे एक टिपरु देखील गाळप न झाल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आदिनाथ कारखान्याच्या निवडणूकीच्या तोंडावर शिंदे समर्थक माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल यानी एकत्र येऊन स्टंट केला आहे का?अशी चर्चा या निमित्ताने तालुक्यात सुरु झाली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

एकशे आठ्ठावीस कोटींचे कर्ज व कामगारांच्या पगारी थकल्याने हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद होता मात्र संचालक व कामगार यांच्या वादात 120 कोटींची साखर विक्री अडकुन पडली होती यांचा वाद कोर्टात गेला होता. या नंतर रोहीत पवार यांच्या बारामती ॲग्रो या कारखान्याने आदिनाथ सहकारी साखर कारखाना पंचवीस वर्षासाठी भाडे तत्वावर घेतला होता मात्र हा करार नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत काही संचालकांनी यावर हारकत घेतली होती. पवारांकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कारखाना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु असतानाच राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कारखाना प्रशासनास हाताशी धरून आर्थिक रसद व सरकारचे वजन वापरून हा कारखाना पवारांच्या ताब्यातून काढून घेतला व माजी आमदार नारायण पाटील कारखान्यावर सत्ता असलेल्या रश्मी बागल यांना एकत्र आणून 25 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोळी टाकुन कारखाना सुरु होत असल्याचे सांगीतले परंतु आठवडा होत आले तरी एक टिपरू देखील गाळप न झाल्याने मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी केलेला कोट्यावधीचा खर्च तोट्यात असलेल्या कारखान्याच्या बोकांडी पडला आहे.

दरम्यान या हंगामात तरी आदिनाथ सुरु होवुन उसाला चांगला दर मिळेल का ? असा सवाल उस उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

●दर सुद्धा जाहीर नाही● मुख्यमंत्री यांनी मोळी टाकल्यानंतर मुख्यमंत्री किंवा चेअरमन उस दरा बाबत घोषणा करून तालुक्यात सर्वाधिक दर जाहीर करुन काटा पेमेंट देण्याची घोषणा करून उस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास मिळवतील आशी अपेक्षेने हजारो उस उत्पादक शेतकरी सभेसाठी उपस्थित होते मात्र त्यांचा देखील अपेक्षाभंग झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

चेअरमन च्या दालनात पवारांचे फोटो - शिंदे गटाचे पदाधिकारी रुसले● तानजी सावंत यांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा कारखाना पवारांच्या ताब्यातून काढला मुख्यमंत्री या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले मात्र कारखान्याचे चेअरमन व संचालक रश्मी बागल यांच्या दालनात शरद पवार अजित पवार यांचेच फोटो कायम होते.सावंत शिंदे यांचे फोटो लागले नाहीत, तसेच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलु दिले नाही निमंत्रण पत्रिकेत सुद्धा नावे नसल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी रुसले आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts