loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थांनी शिक्षणा बरोबरच खेळाकडे लक्ष द्यावे- शंभूराजे फरतडे

विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच खेळा कडे देखील लक्ष द्यावे असे आवाहन हिवरे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभूराजे फरतडे यांनी विद्यार्थांना केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

हिवरे ता करमाळा येथील जिल्हापरिषद शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स जर्सी (खेळाचे गणवेश) वाटप करण्यात आले या वेळी फरतडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे हे उपस्थित होते .

✍ चौफेर प्रतिनीधी

कार्यक्रमा दरम्यान पुढे बोलताना फरतडे म्हणाले की मैदानी खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करतात, खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो. खेळ खेळल्यामुळे अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यात मदत मिळते.खेळण्याने शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते त्यामुळेच शालेय शिक्षणा बरोबरच मैदानी खेळ खेळण्यासाठी पण वेळ द्या असे आवाहन शेवटी फरतडे यांनी केले. या वेळेस मुख्याध्यापक सुग्रीव निळ सहशिकक्षक निळकंठ हनपुडे ,सुरेश शिंदे ,सतिश सुर्यवंशी,जालिंदर हराळे ,पल्लवी कुलकर्णी, दुधाळ गुरुजी ,खरात गुरुजी अंकुश माने आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन निळकंठ हनपुडे यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज मैदान उपलब्ध करून देणार- दिलीपभाऊ फरतडे शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून सुसज्ज शौचालय उपलब्ध करुन दिले आहे.तसेच डिजिटल शिक्षणासठी तिन वर्गांना टिव्ही संच दिला आहे.भविष्यात खेळासाठी लाल माती असलेले सुसज्ज मैदान उपलब्ध करून देऊ असे आश्वासन उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे यांनी दिले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts