loader
Breaking News
Breaking News
Foto

एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत न जोडल्यास सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार- युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांचा इशारा!

सक्तीच्या वीज बिल वसुली साठी महावितरण कडुन शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता सरसकट (डिपी) रोहित्र सोडवुण वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आगोदरच ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांची खरीप पिके शेतातच सडुन गेली आहेत. त्याचे पंचनामे सुरु आहेत,रब्बी हंगाम वाया गेला आहे. शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे आशा परस्थीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ओल्या दुष्काळाने भरडलेल्या शेतकऱ्यांची वीज कट करुन शिंदे -फडणवीस सरकार शेतकऱ्यांची कृर चेष्टा करत असुन एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत नाही केले तर युवासेनेच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळे दहन केले जातील असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की ओल्या दुष्काळा बरोबर मुक्या जनावरांना लंपी आजार झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला, अनेकांचे पशुधन दगावले तर अनेकांचा उपचारांसाठी हजारो रुपय खर्च झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना देखील वीज कनेक्शन कट करण्यात येत होते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आम्ही शेतकऱ्यांचे कनेक्शन कधीच कट केले नाही असे सांगून महाविकास आघाडी सरकार वर टिका करत होते .आज ते सत्तेत आहेत व विशेष म्हणजे करोडो रुपय खर्चून अनेक आमदारांना चार्टर्ड प्लेन ने सुरत गुवाहाटी येथे फिरवून त्यांनी सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापन करण्यात जेवढा खर्च झाला असेल तेवढ्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झाले असते परंतु विरोधात असताना आंदोलनाची भाषा आणी सत्तेत आल्यानंतर सक्तीने वसुली हे दुटप्पी पणाचे लक्षण आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार असताना मार्च महिन्यात वीज कनेक्शन कट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तिन महिने मुदत वाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता .त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल करत होते ते आज उपमुख्यमंत्री आहेत व खऱ्या अर्थाने तेच सरकार चालवत आहेत मग आज ते गप्प का आहेत असा सवाल देखील युवासेनेकडुन उपस्थित करण्यात आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवेदनात शेवटी फरतडे यांनी म्हटले आहे की सध्या उसतोडणी सुरु आहे अनेक उसतोड मजुर वाडीवस्तीवर कोप्या करुन रहात आहेत.वीज कनेक्शन कट झाल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. ज्यांचे उस तोड झाली आहे त्यांना नवीन फुटला होण्यासाठी तसेच ज्यांनी ज्वारी, हरभारा ,व जनावरांसाठी हिरवा चारा केला आहे त्यांना पाणी देणे गरजेचे असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत आहे .उसबील आल्यानंतर शेतकऱ्यांकडून टप्पे पाडून वसुली करावी तोपर्यंत तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावेत आशी मागणी शंभूराजे फरतडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, वीज महावितरण चे अभियंता यांना मेल केल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts