loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 2022 -23 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद , पन्नास खाटांची होणार वाढ- आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 2022 -23 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने 50 खाटांचे हे रुग्णालय लवकरच शंभर खाटांचे रुग्णालय होणार आहे आशी माहिती करमाळा माढा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सा चौफेर ला दिली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये 50 खाटांचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे रुग्णालय इमारत बांधकामासाठी जुलै 2021 मध्ये 25.20 कोटी ची प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती .सदर उपजिल्हा रुग्णालयासाठी 20 ऑक्टोबर 2022 शासनाच्या परिपत्रकानुसार निधीची तरतूद केलेली आहे. सदर निधी सन 2022 - 23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हुडको या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला असून सदर निधी वितरित करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे .त्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालेला असून लवकरच या बांधकामाची निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सन 2022 -23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ग्रामीण रुग्णालय बांधकाम करण्यासाठी 32 कोटी 74 लाख 91 हजार चा निधी हस्तांतरित करण्यात आलेला असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 51 ग्रामीण रुग्णालयाच्या बळकटी करण्यासाठी या निधीच्या उपयोग होणार आहे.असे ही आमदार शिंदे यांनी या वेळी म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts