loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या सकाळी ११ वाजता युवासेनेचे फिसरे येथे रास्ता रोको आंदोलन

हिसरे /हिवरे येथील पुलाची उंची वाढवणे व फिसरे निमगाव गौंडरे रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणी साठी उद्या शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी आकरा वाजता युवासेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

संबंधित मागणीचे निवेदन जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर हिसरे फिसरे हिवरे येथील युवक सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या सह्या आहेत.

भविष्यात हा प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी आग्रही भुमिका घेण्यासाठी परिसराती युवकांनी राजकीय जोडे बाजुला ठेवुन सामाजिक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरवावे असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले आहे.

या निवेदनात हिसरे , येथील पुलाची उंची अतिशय कमी असल्याने या पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ आठ तास वाहतूक ठप्प होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, दुध उत्पादक शेतकरी, व प्रवाशांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे जिर्ण झालेल्या या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन नवीन पुलावरून उभारणी करावी. हिवरे येथील पुलाची देखील अशीच परिस्थिती असून या पुलाची देखील उंची वाढवणे गरजेचे आहे. तसेच फिसरे ते कोळगाव दरम्यान रस्त्यावर अंत्यत खड्डे झाले असल्याने रस्त्यावर अक्षरश तळी साचत आहेत मात्र दहा वर्षांत साधा मुरुम देखील या रस्त्यावर टाकलेला नाही हे सर्व खड्डे तात्काळ डांबरीकरण करुण बुजवावेत अन्यथा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा. तसेच कोळगाव- गौंडरे या रस्त्यावर कृष्णा खोरे अंतर्गत झालेल्या कॅनॉल वरिल पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे मात्र याची नेमकी जबाबदारी परांडा पाटबांधारे विभागाची का ? जिल्हापरिषद बांधकाम विभागाची या वादात हा धोकादायक खड्डा (भगदाड) तसेच पडून आहे.त्याबत खुलासा व्हावा . आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. पुर्व भागातील सहा ते सात गावांचा हा गंभीर प्रश्न असुन अनेक दिवसांपासून मागणी करुण देखील द प्रशासन दाद देत नाही. मागील काहि वर्षा पुर्वी हिसरे येथील सैन्य भरती साठी निघालेला एक युवक खड्डे चुकवण्याच्या नादात दोन मोटारसायकल मध्ये समोरासमोर धडक होऊन मृत्युमुखी पडला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असुन जोपर्यंत करमाळा येथील जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जागेवर येवून ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत जागेवर उठणार नसल्याचे भुमिका आंदोलनकर्त्यांची असणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts