loader
Breaking News
Breaking News
Foto

नामदार तानाजी सावंत यांच्यामुळेच 'आदिनाथ' 'सहकारी'तत्वावर चालण्याची संधी- नारायण पाटील

.आदिनाथ सह.साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्यमंञी तानाजी सावंत यांनी नऊ -दहा  कोटी रूपये भरले आहेत.सावंत यांनी हे पैसे भरल्यानेच कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यास संधी मिळाली असुन सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.आदिनाथ मंदिरात आदिनाथ महाराजांना अभिषेक घालून कारखान्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला .यावेळेस पाटील बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले ,आदिनाथ कारखाना सहकारीच राहीला पाहिजे यासाठी आपण आदिनाथ महाराजांच्या आशीर्वादाने प्रयत्न केले आणि त्याला यश आले आहे. माझे वडील स्व.गोविंदबापु पाटील व इतर मंडळीचा या कारखान्यासाठी मोठा त्याग आहे.या त्यागाची जाणीव ठेवुन मी कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न केला.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे सहकार्य केले आहे.यापुढेही त्याचे सहकार्य राहणार आहे. हा कारखाना सुरू सुरळीत चालण्यासाठी आदिनाथ महाराज योग्य मार्ग दाखवतील अशी मी आशा बाळगून आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याची एवढी दुरावस्था झालेली असताना देखील  आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कारखान्यासाठी नऊ दहा -कोटी रुपये भरले, ही फार,मोठी गोष्ट आहे.चालू हंगामात कारखाना सुरू करून  पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वेळी हरिदास डांगे,   देवानंद बागल, जयप्रकाश बिले ,डाॅ.वसंत पुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले  . तर  साडे येथिल ऊस उत्पादक शेतकरी दत्ता जाधव यांनी कारखान्यासाठी एक लाख रुपये रोख मदत यावेळी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळेस बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की आदिनाथ सहकारी ठेवण्यात आम्हाला यश आले असून तो चालवण्यास सर्वांची मदत लागणार आहे .तसेच त्यांनी यावेळेस मोठे राजकीय वक्तव्य केल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.   कारखान्यांबाबत  आम्हाला व बागलांना (बागल-पाटील गट)यांना एकत्र काम करण्याच्या सूचना प्रा. तानाजी सावंत यांनी दिल्या असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.त्यामुळेच नारायण पाटील यांच्यातंनतर आत्ता रश्मी बागल दिग्विजय बागल हे देखील मंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या व आगामी जिल्हापरिषद पंचायत समीती नगरपालिका निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील बागल पाटील गट युती करुन लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts