loader
Breaking News
Breaking News
Foto

जेऊर महावितरण च्या हलगर्जी पना मुळे जेऊर व परिसरातील नागरिक हैरान

जेऊर 33/11 केव्हि उपकेंद्रातुन जेऊर आणी परिसरातील गावांना घरगुती ,व्यवसायिक व शेतीपंपाना वीजपुरवठा केला जातो.जेऊर शहरासाठी स्वतंत्र फिडर अस्तित्वात आहे.तिन मोठ्या क्षमतेच्या ट्रान्सफार्मर वरुन सर्वत्र वीजपुरवठा दिला जतो.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पंधरा दिवसापुर्वी या तिन पैकी एक ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यामुळे उर्वरित दोन ट्रान्सफार्मरवर जादा दाब वितरीत करण्यात आला त्याचा परिणाम दुसराही ट्रान्सफार्मर जळण्यात झाला.गेले पंधरा दिवस ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन आणण्याऐवजी जेऊर उपकेंद्राला जोडलेल्या गांवाना कपात करून वीज दिली त्यामुळे शेतीपंपासाठी आठ तासा ऐवजी चार तास वीजपुरवठा सुरु आहे .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

महावितरण कडुन दुरुस्ती ऐवजी आहे त्या यंत्रणेतच वीजपुरवठा करण्याचे धोरण वीजग्रहांकावर अन्याय करणारे असुन गेल्या चोवीस तासांपासुन जेऊर व्यापार पेठेतीत वीजेवर अवलंबून असलेले छोटे व्यवसायिकांचे उद्योग ठप्प झाले आहेत. जेऊर सह परिसरातील नागरिकांकडून वीज महावितरण विरोधात असंतोष पसरला आहे. व्यवसायिकांकडुन कमर्शियल दराने वीज बिल आकारले जात असेत तर त्यांना अखंडीत वीज पुरवठा करणे गरजेचे आहे.एरव्ही वीजदुरुस्ती साठी दोन तास जरी वीज कपात केली जाणार असेल तर वीजग्रहांकाच्या मोबाईलवर किमान पाच वेळा तरी संदेश प्राप्त होतात मात्र चोवीस तास वीज गायब असताना वीज महावितरण दुर्लक्ष करत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज अधिकाऱ्यांना तातडीचे सेवा दुरुस्ती करणे अवघड जात आहे रिक्त पदे तातडीने भरली जावेत. जर लवकर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास जेऊर व परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts