loader
Breaking News
Breaking News
Foto

मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केला मंत्री तानाजी सावंत यांचा सत्कार! सावंतानी दिला शब्द!

शिवसेनेचे युवा नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी तानाजी सावंत यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी देखील दोन दिवसापुर्वीच नामदार तानाजी सावंत यांची भेट घेऊन सत्कार केला होता तसेच सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ सहकारी तत्त्वावरच चालावा या करता पाटील यांनी मोर्चेबांधनी सुरु केली आहे.अशातच मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल यांनी देखील तानाजी सावंत यांची भेट घेऊन सत्कार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा चौफेर च्या प्रतिनिधीकडुन या भेटीबाबत दिग्विजय बागल यांच्याशी बातचीत केली असता दिग्विजय बागल म्हणाले कि, तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला होता ,तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु होती. त्यामुळेच आमचे व सावंत यांचे घनिष्ठ कौटुंबिक नाते आहे. आज ते राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी विराजमान झाले आहेत व ते देखील स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाईक आहेत. त्यामुळेच त्यांचा भेटुन सत्कार केला आहे.याचा कोणताही राजकीय अर्थ लावु नये असेही ते म्हणाले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

तालुक्याच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी मि सदैव मदत करेल असा शब्द तानाजी सावंत यांनी दिला असल्याची बोलकी प्रतिक्रिया दिग्विजय बागल यांनी दिली आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts