loader
Breaking News
Breaking News
Foto

अमीत निमकर यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी काढले. मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा उपअभियंता अमित निमकर यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी निमकर यांना राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिमा भेट देण्यात आली.नूतन उपअभियंता श्री उबाळे यांचे स्वागतही यावेळी करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,मार्गदर्शक बाळासाहेब सुर्वे,जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पोळ, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब झोळ, अजिनाथ घाडगे,सचिव सचिन शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे,डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हा कार्याध्यक्ष सतीश वीर, तालुका कार्याध्यक्ष संतोष शितोळे,राज झिंझाडे, मदन खाटमोडे, किरण चौधरी आदी उपस्थित होते.

करमाळा तालुकवासीयांच्या तसेच मराठा सेवा संघ व ३३कक्ष यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे .भविष्यकाळातही असेच काम करत राहणार असून समाजाप्रती असलेली नाळ कायम राहील अमित निमकर- उपअभियंता बांधकाम विभाग

तालुका प्रतीनिधी

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला अमित निमकर यांच्यासारख्या अभियंत्यांची गरज आहे.श्री निमकर यांनी सेवा बजावत असताना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत तन मन धनाने बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले.मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात निमकर यांच्या काम करण्याची शैली, मराठा सेवा संघाच्या बांधणीतील त्यांचे योगदान अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत अशा अधिकाऱ्यांच्या सोबत मराठा सेवा संघ असेल अशी ग्वाही दिली. आभार सतिश विर यांनी मानले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अमित निमकर यांचे कार्य प्रेरणादायी -तात्यासाहेब पाटील

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts