loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेची माफी मागावी- युवासेना माजी समन्वयक शंभुराजे फरतडे यांची मागणी

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.दरम्यान करमाळ्यात देखील या वक्तव्याचे पडसाद उमटले असून युवासेनेचे माजी तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांचा तिव्र शब्दात निषेध केला आहे.

✍ चौफेर प्रतिनीधी

प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात फरतडे यांनी म्हटले आहे की राज्यपाल कोश्यारी यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान करणारे असुन राज्यपाल यांचा करावा तेवढा निषेध कमी असल्याचे म्हटले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

महाराष्ट्रच्या व मुंबई च्या जडणघडणीत अमूल्य असे योगदान व त्याग केलेल्या विरांचा हा अपमान आहे. राज्यपाल पद हे घटनात्मक दर्जाचे पद असताना महाराष्ट्रात राजकीय धार्मिक, प्रांतीक अस्थिरता निर्माण करण्यासाठी कोश्यारी हे जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळेच कधी नव्हे ती राज्यपाल पदावरील व्यक्तीवर टिका करण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर आली आहे.ते राज्यपाल कमी परंतु भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखी विधाने करत आहेत. मंत्री मंडळ शपथविधी, असो राज्यपाल नियुक्त आमदार निवड असो त्यांनी भाजपाला पुरक अशी भुमीका घेतली आहे.आज मुंबई वर केलेल्या वक्तव्याने त्यांचा महाराष्ट्रा द्वेष दिसुन आला आहे.महाराष्ट्रा बद्दल एवढाच द्वेष असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोडावे व गुजराती, राजस्थानी चे ब्रँड अम्बेसिडर व्हावे असे देखील फरतडे यांनी म्हटले असून राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील 11 कोटी मराठी बांधवाची माफी मागावी अन्यथा शिवसेना युवासेना तिव्र आंदोलन करेल असा इशाराच फरतडे यांनी दिला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts