loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उद्यापासून सोलापूर दौर्‍यावर!

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांनी बैठका ,निष्ठा दौरा यांचा धडाका लावला आहे. शिंदे समर्थक अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून निष्ठावंतांना संधी दिली आहे .सोलापूर चे संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्या जागी मुंबई येथील लालबाग परळचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.कोकीळ हे उद्या पासून तिन दिवस सोलापूर दौर्‍यावर येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अनिल कोकीळ हे मागील महिन्यात पक्ष निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते त्यावेळेस प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला आहे.त्यामुळेच पदाधिकाऱ्यांच्या ओळखी, त्यांच्या कामाचा आवहाल कोकीळ यांना अवगत झाला आहे. त्यामुळे संपर्क प्रमुख म्हणून काम करताना नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा मेळ घालून नवी मोट बांधणे त्यांना सोप्पे जाणार आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून या आगोदर दिवंगत रामभाऊ भंकाळ, दिवंगत विलास भानुशाली, विश्वनाथ नेरूरकर, खा गजानन कीर्तिकर, खा राहुल शेवाळे यांनी काम पाहिले आहे. या सर्वांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना वाढीसाठी बहुमूल्य असे योगदान दिले आहे.त्यामुळेच या पदाला वेगळेच महत्त्व आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

नुकतेच बडतर्फ झालेले संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांचे संपर्क प्रमुख म्हणून सोलापूर जिल्ह्यातील काम फारसे उल्लेखनीय झाले नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे आमदार वाढवण्यासाठी अनेक प्रयोग राबवले पण ते यशस्वी झाले नाहीत. तसेच जिल्हाप्रमुख यांच्याशी देखील त्यांचे सुत फारसे जुळले नाही . संघटनात्मक बांधणीकडे पण त्यांनी लक्ष न दिल्याने युवासेना, शिवसेना ,महिला आघाडीची अनेक पदं रिक्त आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जुने नवे शिवसैनिक अक्रमक झाले असले तरी अंतर्गत मतभेद आहेत त्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठेवण्यासाठी आजवरच्या मातब्बर संपर्कप्रमुखांपेक्षा सरस काम कोकीळ यांना करावे लागणार आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts