राष्ट्रवादी काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदावर पुन्हा एकदा संतोष वारे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले असून वारे यांच्या निवडीने मांढरे पाटील यांना पुन्हा पक्षाने डच्चु दिला आहे .तर दुसरीकडे आमदार संजयमामा शिंदे यांना देखील राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी एकप्रकारे सुचक इशारा दिल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी सोडून सेनेचे शिवबंधन हाती घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या निवडणक कार्यकर्त्यांनी वाईट वेळेत देखील घड्याळाची साथ सोडली नव्हती .या मध्ये मांढरे पाटील यांचा देखील समावेश होता. त्यांची निष्टा पाहून पक्षाने त्यांना तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली मात्र मांढरे यांना आपली छाप सोडता आली नव्हती. त्यांच्या कालावधीत गटबाजीस उधान आले होते.
बागल यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वारे यांचे बागल यांच्याबरोबर बिनसल्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.वारे यांच्या पत्नी राणी वारे या राष्ट्रवादीच्या जिल्हापरिषद सदस्य असल्याने त्यांना राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष पद मिळवणे सोप्पे गेले होते.वारे यांच्या निवडीनंतर मांढरे यांनी निष्ठावंतावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून वेळोवेळी वारे यांच्यावर निशाणा साधण्याचे काम केले होते. संतोष वारे यांनी तालुकाध्यक्ष पद भेटल्यानंतर दुष्काळी परिस्थितीत स्वखर्चाने टँकर द्वारे तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची सोय केली, कोविड कालावधीत शरदचंद्र पवार यांच्या नावाने कोविड सेंटर उभारून हजारो रुग्णांना दिलासा दिला, किरणा किटचे वाटप केले. पक्षाचे काम जोमाने करत असताना दोन महिन्यांपूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या शिफारसी नुसार अजीत पवार व सुप्रिया सुळे यांनी मांढरे यांची पुन्हा तालुकाध्यक्ष पदावर निवड करून वारे यांना अनपेक्षित असा धक्का दिला होता. वारे यांना पदावरून हटविण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील छुपी ताकद वापरली होती अशी चर्चा त्यावेळेस झाली होती.पदावरून बडतर्फ केल्यानंतर वारे समर्थक अक्रमक झाले होते राजीनाम्याच्या पावित्र्यात होते मात्र वारे यांनी शांत राहून आपल्या समर्थकांकडून झालेली निवड चुकिची असल्याचा संदेश पद्धतशीर पणे वरिष्ठांपर्यंत पोहचवला. अखेर आज पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतोष वारे यांची पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करून मांढरे यांना पायउतार केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.